डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समिती उरण शहर शाखा क्रमांक ८४३ व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या वतीने सोमवार दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती महोत्सव उरण शहरात बौद्धवाडी येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
१३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता बुगीबुगी कार्यक्रम, रात्री १२ वाजता बुद्धपूजा, १४ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वा. बुद्ध विहार उरण बौद्धवाडी येथे सामूहिक बुद्ध पूजा, सकाळी १० वा. ध्वजारोहण, सकाळी १०:३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान उरण येथे सामूहिक बुद्धपूजा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा ८४३ कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, चिटणीस विजय पवार, खजिनदार अनंत जाधव, कार्याध्यक्ष हर्षद कांबळे, उपाध्यक्ष अखिलेश जाधव, सहचिटनिस रोशन गाढे, सहखजिनदार सुरेश गायकवाड, बौद्धाचार्य प्रमोद कांबळे, विनोद कांबळे, संदेश वाहक – अजय कवडे, संकेत साळवी, माता रमाई महिला मंडळ कमिटीचे अध्यक्षा सुनीता सपकाळे, उपाध्यक्ष संगीता जाधव, सचिव करुणा भिंगावडे, सहसचिव कविता जाधव, सह खजिनदार चंद्रभागा जाधव, संदेश वाहक – सुजाता साळवी आदींनी विशेष मेहनत घेतली.
या प्रसंगी आमदार महेश बालदी, उरण नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच इतर मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून ते दिनांक १७ तारखे पर्यंत दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी दिली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.