डी. एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू ! जाणून घ्या महत्वाच्या तारखा

Teacher Primary
पुणे :
डी. एड. अभ्यासक्रमासाठी  प्रवेश घेऊ पाहणार्‍या विद्यर्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर डी.एल.एड. प्रथम वर्ष अभ्यासाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. आजापासून विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
 महत्वाच्या तारखा
12 पास झालेले विद्यार्थी सोमवार दि 3 जूनपासून ते 18 जून या कालावधीत डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करु शकतात. DIET स्तरावर पूर्ण भरलेल्या अर्जाची ऑनलाईन पडताळणी 3 ते 19 जून या कालावधीत केली जाणार असून 26 जून रोजी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रवेशाबाबतची सर्व माहिती https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
D.L.Ed प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी दि. 27 जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना दि. 27 जून ते दि. 1 जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी दि . 2 जुलै पर्यंत महाविद्यालयांचे विकल्प भरता येणार असून पूर्वी भरलेले विकल्प बदलता येणार आहेत. दि. 4 जुलै रोजी प्रवेशाची दुसरी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या दि. 4 जुलै ते दि. 8 जुलै या कालावधीत प्रवेश घेता येतील. प्रवेशाची तिसरी फेरी दि. 11 जुलै रोजी सुरू होईल. तर की. 15 जुलैपासून प्रथम वर्षांचे प्रवेश सुरू होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading