रस्त्याने चाललेल्या टँकरने अचानकपणे वळण घेतल्याने या टँकरच्या चाकाखाली स्कुटी गाडी येवून त्या गाडीवरील तिघेजण गंभीररित्या जखमी होवून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील जुने मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेलकडे जाणार्या लेनवर कोन गावाच्या हद्दीत घडली आहे.
शोबित सतीश सालुजा त्याची पत्नी जुई सालुजा व मुलगी लाडो सालुजा असे तिघेजण त्यांच्याकडे असलेल्या अॅक्टीव्हा स्कुटी गाडी नं.एमएच-46-बीएल-4496 वरुन प्रवास करीत असताना त्यांची गाडी गोल्डन नाईट बार समोरील कोन गाव हद्दीत आली असता समोरुन जाणार्या टँकर नं.एमएच-04-केएफ-7417 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील टँकर अचानक वळण घेतल्याने यावेळी शोबित सालुजा यांच्या ताब्यातील गाडी सदर टँकरच्या चाकाखाली येवून त्यात तिघेजण गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत.
या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.