झुगरेवाडी आदिवासी बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Karjat Shivsena Pravesh
कर्जत/कशेळे ( मोतीराम पादीर ) : 
 कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ओलमन हद्दीतील झुगरेवाडी येथील आदिवासी बांधवांनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी हा प्रवेश सोहळा कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर,विधानसभा अधिकारी अ‍ॅड.संपत हडप,महिला संघटिका करुणा बडेकर,माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके, माजी पंचायत समिती सभापती पंढरीनाथ राऊत,उपशहरप्रमुख कृष्णा जाधव,आदिवासी संघटना प्रमुख मालू निरगुडा,उपतालुका संघटक रवी ऐनकर,कळंब जिल्हापरिषद विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे,जिल्हापरिषद संघटक रमेश भुसाळ, कळंब पंचायत समिती विभाग प्रमुख संतोष बदे, झुगारेवाडी शाखाप्रमुख गणपत पारधी, महिला शाखा संघटिका कविता पारधी, रामदास ठोंबरे, संतोष ऐनकर, विनायक चोखट प्रमुखांसह शिवसेना – युवासेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
 कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ओलमण हद्दीतील झुगरेवाडी येथील असंख्य आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी झुगरेवाडी येथील ज्ञानेश्वर पारधी, दाजी पारधी,मंगल झुगरे, रघुनाथ पारधी,भाऊ खडके,आंबो पारधी, पालिबाई झुगरे,शानू पादिर, वैशाली पारधी,नंदा पादिर,काली पारधी, सुमन झुगरे,रंजना झुगरे, लक्ष्मी पारधी,वर्षा झुगरे,मीना झुगरे, रेखा झुगरे,शोभा झुगरे, अर्चना झुगरे, जया पारधी, लीला झुगरे, सुरेखा झुगरे,जनाबाई पारधी,शकुंतला झुगरे,सुशीला झुगरे, ममता झुगरे,प्रतीक्षा पारधी, मनीषा झुगरे, वंदना केवारी, मनीषा झुगरे, कुसुम पारधी या अदिवासी बांधवांनी प्रवेश केला असून या पक्ष प्रवेशाने कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची पक्ष बांधणी मजबूत होतांना पाहायला मिळत आहे.
सर्व आदिवासी समाज बांधवांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेना पक्षात स्वागत करीत पुढील काळात आपल्याला पक्षाच्या वतीने ताकद देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. तसेच आपल्या कोणत्याही समस्या असल्यास त्या आमच्या समोर मांडाव्यात, जेणेकरून त्या समस्या तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading