ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलं : अनंत गीते

Anant Gite Alibag
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
माजी केंद्रीय मंत्री बॅ. अंतुले यांनी राजकीय जन्म दिला, शरद पवारांनी नावलौकीक दिले. तसेच, शेकापचे जयंत पाटील यांनी बळ दिले. त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले आहे. काँग्रेसचे नेते माजी आ. मधुकर ठाकूर यांचादेखील तटकरेंनी विश्वासघात केला आहे. अशा विश्वासघातकी माणसाला शिक्षा झालीच पाहिजे.असे प्रतिपादन रायगड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे संवाद सभेत केले.
यावेळी व्यापीठावर माजी आमदार पंडित पाटील, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे विष्णू पाटील, किशोर जैन, सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, कदम, शेकापचे विजय गिदी, वामन चुनेकर, मुरुडचे माजी नगर सेवक आशीष दिवेकर, काँग्रेस चे प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर, जिल्हा महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजा ठाकूर, तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक राष्ट्रवादी शरद पवार गतचे अमीर खानजादा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनंत गीते म्हणाले की, शेकापच्या जंयत पाटील यांनी सुनील तटकरे यांची २०१९ ला साथ दिली नसती तर, ते रायगडच्या आणि राज्याच्या राजकारणातून कायमचे हद्दपार झाले असते . मात्र शेकापने आता त्यांची चुक सुधारली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ पाठीशी आहे. त्यामुळे यावेळी तटकरेंची हद्दपारी अटळ असल्याचेही ते म्हणाले. माणगाव रोहा आणि सुधागड अशा तालुक्यांचा दौरा पहिल्या फेरीला पूर्ण केला आणि आता कालपासून वेळ अलिबाग अशी दुसरी आता सुरू झालेले खारेपाटाची सभा दृष्ट लागावी अशी होती ही चित्रा ताईला तिथे धन्यवाद दिले मी अलिबागच्या दौऱ्यावर होतो आणि मला समजले की मीनाक्षी पाटील ह्या आजारी आहेत. मी त्यांना फोन केला तेव्हा मला त्या म्हणाले की मी वाशीला ट्रीटमेंट करता आलेली आहे. माझी पत्नी कमी वयात त्याच आजाराने गेली. जेव्हा मी पेझारी येथे मीनाक्षी पाटील यांना भेटण्यासाठी गेलो असता त्या मला भेटायला येवू लागल्या तेव्हा मी त्यांना बाहेर आल्यावर येऊ नका तुमच्यासाठी खारी आणि चहा ठेवली मला काही आता दुपारची वेळ झाली आहे जेवण झाले होते. त्यांनी घराच्या शेजारी असणाऱ्या प्रांगणामध्ये एक स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे तिथे नारळ ठेवून मी प्रार्थना गणपतीला तुमच्या करता करणाऱ्या माझी इच्छा प्रामाणिक मी गणपतीला साकडे घालणार आहे की तुम्ही विजयी होण्यासाठी तटकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्याची गरज नाहीं
अंतुले यांचा किस्सा सांगतो मतदार संघाची फेररचना झाली होती. माझा मतदार संघ हा दोन मतदार संघात विभागला गेला होता. त्यावेळी मला बाळासाहेब यांनी विचारले तेव्हा मला विचारले की तिथे अंतुले आहेत आणि ते आपलेच आहेत त्यांच्या विरोधात तू लढणार का तेव्हा मी सांगितले की लढणार का तेव्हा मी सांगितले की आदेश दिला त्तर मी लढणार. त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी आदेश दिला आणि मी त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभा राहिलो. निवडणुकीच्या दिवशी मी मतदार फिरून रात्री उशिरा सुरेंद्र म्हात्रे यांच्या घरी जेवून अलिबाग येथे बिग फ्लॅश हॉटेलला वस्तीला आलो. तेव्हा तेथे विजू कवळे हे बाहेर उभे होते त्यांनी सांगितले की अंतुले यांना तुम्हाला भेटायचे आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटलं.म्हणून मी त्यांच्याकडे गेलो असता अंतुले यानी संगितले की, तुमच्याशी जेवण करत गप्पा मारायच्या आहेत. तेव्हा मी त्यांना सांगितले की मी फ्रेश होऊन येतो. माझ्या आणि त्यांच्या रूम मध्ये फक्त एका भिंतीचा अडसर होता.मी त्यांची रूम नंबर 203 मध्ये गेलो त्यांनी मला जेवायला सांगितले. त्यांनी दोन जेवणाची ताट वाढायला संगितले होते.
मात्र त्यांना मी सांगितले की माझे जेवण झाले आहे. त्यांनतर आमच्या गप्पा सुरू असताना माझ्या पत्नीचा फोन आला असता त्यांनी मतदान बाबत विचारलं असता मी सांगितले आहे की, मतदान व्यवस्थित पार पडले असून मी आता अलिबाग येथे माझे प्रतिस्पर्धी अंतुले यांच्या सोबत गप्पा मारत आहे. असे सांगितले असता तिने सांगितले की माझी चेष्टा कशाला करता मात्र तिला खर वाटावे म्हणून मी माझा फोन अंतुले यांच्याकडे दिला त्यांनी माझ्या पत्नीशी पंधरा वीस मिनिटे चर्चा केली आणि शेवटला सांगितले की माझा पराभव झाला तर मला वाईट वाटणार नाही. माझा पराभव हा एका सज्जन उमेदवार समोर झाला आहे.
माझे शिवसैनिक नौशाद हा मला मत देण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या घरी जायचा तेव्हा तो त्यांना समजवून सांगत असे, मात्र त्यांनतर माझे विरोधक हे त्या घरात जावून सांगायचे की गीते यांना मत म्हंजे भाजपला मत. आता विरोधक यांना मत दिले तर ते कुठे जाणार आहे. सुनील तटकरे हे तर आता मोदीच्या मांडीवर जावून बसले आहेत. जिल्ह्याला रायगड का नाव ठेवले या जिल्ह्यात रायगड किल्ला आहे रायगड किल्ले वर फितूर साठी एक सोय होती ती म्हणजे टकमक टोक आहे.
माझी नाळ जनतेशी, मातेशी जुळली आहे. एक वेगळे संकट या देशात घोंगावत आहे Evm की भीती बाळगू नका जे मतदान होईल वत्यातील 70 टक्के मतदान गीते यांना होणार आहे. असा विश्वास यावेळी गीते यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात निधी आला तो मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुळे रायगड जिल्ह्याचा विकास तर होणार आहे लोकांना सांगितले पाहिजे बोर्ली ची जनता हुशार आहे पैसे वाटले म्हणून विजय होणार नाहीं मी आमदार झाल्यानंतर मला विधान सभेत आमदार जयंत पाटील किंवा मीनाक्षी पाटील यांचा भाऊ अशी ओळख होईल. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची होती. म्हणून मी विधान सभेत पहिल्याच दिवशी भाषण केले त्याच दिवशी महाराष्ट्रात पोहचले. जेव्हा गीते यांचा पराभव झालं तेव्हा पहिला फोन पंडित शेठ यांनी मोदी घाबरतो गीते साहेब यांना जनतेला फोन उचरणारा नेता हवा आहे.
कार्यकर्ता असावा तर प्रशांत मिसाळ, सुरेंद्र म्हात्रे सारखा. गीते यांनी त्यांच्या राजकारणात पैसे कमवले असते. मात्र त्यांनी तसे केले नाहि.किशोर जैन विष्णू पाटील यांची आघाडी करण्यात महत्वाचे आहे.जयंत पाटील यांनी चूक सुधारली आणि जयंत पाटील आणि गीते हे एकत्र आले आहेत. पंडित शेठ पण चालला, पप्पू शेठ चालला आम्ही कशाला जावू आमचा धैर्यशील करून घ्यायचे का ?माझ्या जवळची लोक ही विश्वास घात करीत दुसऱ्या पक्षात गेली जयंत पाटील यांच्या मध्ये दम आहे म्हणून त्यांनी गीते यांना पाटील यांनी पाठिंबा दिला. कितीही ही आमिषे दिली तरी गीते हे निवडून येणारं आहे लोकशाही टिकली पाहिजे. भ्रष्टाचार वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.पाच कोटींच्या रस्ता करण्यात पंडित पाटील यांनी पैसे खाले. आता त्याच रस्त्याससाठी पन्नास कोटी खर्च केले जात आहेत त्यामधे किती पैसे रस्ता होत. रायगड जिल्ह्यात पंडित शेठ यानी विकास कामे करीत पाणी सुध्दा पाजले आहे. बोर्ली गावाला सुद्धा पाणी पाजले. उमेदवार कसा असावा तर गीते सारखा. गीते दिल्लीला जाणार असल्याचे मीनाक्षी पाटील यांनी सांगितले होते. गीते यांनी कधीच कंपनीचे भंगार विकला नाही माझे घर साधे आहे आणि कार्यकर्ते यांची मोठी घरे आहेत.गीते यांची गाडी दिल्ली ला गेली पाहिजे यावेळी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर ,विजय गिदी,नौशाद दळवी, वामन चुनेकर , जिल्हा काँगेस उपाध्यक्ष अजगर दळवी, श्रद्धा ठाकूर, प्रमोद भायदे यांनी मनोगत व्यक्त केले तर नौशाद दळवी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading