कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील मंजुळा नारायण लोखंडे एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी खांबचे ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम चार विद्यार्थीनी स्काऊट व गाईडच्या राज्य पुरस्कारासाठी परीक्षा दिली. विशेष म्हणजे रायगड मधील ४ स्कूलच्या विद्यार्थीनीनी परीक्षा दिली असुन यामध्ये रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब येथील एकमेव स्कूलच्या मुलींनी सहभाग घेतला.व आर्या चितळकर,आराध्या कचरे,श्रुती धनावडे,आर्या कनघरे या चार मुलींनी परीक्षा दिली.
या राज्यपूरस्कारासाठी रायगड, ठाणे, पालघर, या जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. यामध्ये नियम, वाचन, इतिहास, स्काऊट गाईडची प्रार्थना,झेंडा गीता, राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज, जागतिक ध्वज यांच्या तोंडी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक,लेखी, परीक्षण अशा विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात आल्या.
दादर,मुंबई येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत दादर येथील परीक्षक औटी मॅडम,हेमांगी मॅडम,मार्गदर्शक जिल्हा संघटक आयुक्त सोनाली राठोड मॅडम, जिल्हा प्रशिक्षक आयुक्त प्रशांत गायकवाड सर, डफळ मॅडम, संतोष दाते सर,रुपेश गमरे सर, दळवी सर, तसेच ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूलचे संस्थापक काऊटर रविंद्र लोखंडे मुख्याध्यायिका गाईड रिया लोखंडे मॅडम, केंद्रप्रमुख रश्मी साळी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.