जैन मंदिराची प्राणप्रतिष्ठा; हेलिकॉप्टर मधून पुष्पांजली

Jain Mandir Nagothane
नागोठणे ( महेंद्र माने) :
जैन सकल संघाच्या वतीने श्री चंद्रप्रभस्वामी भगवान मंदिरात गेल्या महिनाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रतिष्ठाचार्य प.पू.आ.भ.श्री देवकीर्तिसूरीश्वरजी म.सा.आदि ठाना आणि साध्वीजी भ. आदि ठाना यांच्या पावन उपस्थितीत श्री चंद्रप्रभस्वामी भगवान मंदिरातील चंद्रप्रभस्वामी दादा आदि तीर्थंकर भगवान आणि देवीदेवता यांची अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा महोत्सव शुक्रवार 07 फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या वेळी मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
नागोठणे नगरीवरीतील सर्व नागरिकांच्या सुख-शांती-समृद्धि आणि अध्यात्म उन्नती व सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवणारे तसेच 150 वर्षांहून अधिक पूर्वीच्या अधिष्ठाचार्य तीर्थंकर परमात्मा श्री चंद्रप्रभस्वामी भगवान मंदिराचा जिर्णोध्दार प्रतिष्ठाचार्य प.पू.आ.भ.श्री देवकीर्तिसूरीश्वरजी म.सा.आदि ठाना आणि साध्वीजी भ. आदि ठाना यांच्या पावन उपस्थितीत नुकताच करण्यात आला. पूर्वीच्या मंदिराच्या ठिकाणी आता भव्य मंदिर उभारण्यात आले असून त्या निमित्त गेल्या महिनाभर साजरा करण्यात आलेल्या प्राणप्रतिष्ठा मोहोत्सवात शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ ते मंदिर पर्यंत जागो जागी कमान,मंडप आकर्षक विद्युत रोषणाई तसेच शहरातील प्रत्येक मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी राज्यभरातून आलेल्या जैन समाजासह हजारो भाविक उपस्थित होते. या धार्मिक कार्यक्रमाची सांगता शहरातील सर्व नागरिकांना महाप्रसाद देऊन करण्यात आली. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन सकल संघ, ट्रस्ट तसेच जीर्णोद्धार समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading