जी.के. म्हात्रे इंग्लिश स्कूल, वाशी येथील विद्यार्थीनी मनुश्री उल्हास म्हात्रे हिने इयत्ता 8 वी (सन 2023-24) मध्ये गणित संबोध परीक्षेत रायगड जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या परीक्षेचे आयोजन रायगड गणित अध्यापक मंडळाने केले होते.
पारितोषिक वितरण सोहळा प्रायव्हेट हायस्कूल पेण येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मोरे, समिती प्रमुख संतोष जाधव, प्रकाश सरोटे, खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून या कार्यक्रमाला विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
मनुश्रीच्या या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तिच्या मेहनतीचे आणि शाळेच्या मार्गदर्शनाचे फळ असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.