जि.प.च्या आमडोशी केंद्रातील विद्यार्थी महाराष्ट्रात इतिहास घडवतील – संतोष कोळी

Amdoshi Zp School
नागोठणे (महेंद्र माने)  :
रायगड जिल्हा परिषद व रोहा पंचायत समिती, शिक्षण विभाग यांच्या आयोजित आमडोशी केंद्र अंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा पिंगोडे येथे मंगळवार 18 मार्च रोजी रोहा गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे, माजी सरपंच संतोष कोळी, माजी उपसरपंच कांचन माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंगोडे शाळेत घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय बौध्दिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या वेळी रायगड जिल्हा परीषदच्या आमडोशी केंद्रातील विद्यार्थी एक दिवस महाराष्ट्रात इतिहास घडविणार असल्याचा विश्वास संतोष कोळी यांनी व्यक्त केला.
यावेळी केंद्र प्रमुख रंजना पाटील, केंद्रातील आठ शाळेतील सुभाष कांबळे, अल्ताफ शेख, मंगल निर्मल, अनिल नागोठकर, रूपाली कोळी, सूचिता पाटील, देवेंद्र सरगडे, तेजेस वारगुडे, रूपेश वारगड, भास्कर लेंडी, कमलाकर लेंडी, सोनल पाटील, मनोज जाधव, रंजना पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्रातील आठ शाळेतील पहिली ते पाचवी लहान गट पाढे पाठांतर,स्पेलिंग पाठांतर,इंग्रजी गोष्ट सांगणे,व प्रश्न मंजूषा तसेच सहावी ते सातवी मोठा गट पाढे पाठांतर,इंग्रजी संवाद लेखन,इंग्रजी वकृत्व स्पर्धा व प्रश्न मंजूषा या विषयांवर प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या मेडल व प्रशस्ती पत्रक उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संतोष कोळी यांनी सांगितले की, आज सर्व पालकांना इंग्रजी शिक्षणाचे वेड लागले असले तरी येथे मराठी शाळेत शिकणारी मुले यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळत असलाने खूप हुशार असता. त्यांच्याकडे शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे असून क्षिक्षकांनी अशा प्रकारच्या विविध स्पर्धा नेहमी घ्याव्यात; ज्यामुळे मुलांची चांगली तयारी होऊन हेच विद्यार्थी पुढे जात एक दिवस महाराष्ट्रात इतिहास नक्कीच घडविणार असल्याचा विश्वास व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक किंवा विविध स्पर्धेसाठी लागणारी सर्व प्रकारचे योगदान देण्यास कटिबद्ध असल्याचे शेवटी कोळी यांनी सांगितले.
कांचन माळी यांनी येथील शिक्षक अतिशय हुशार व मेहनती असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. मेघना धायगुडे यांनी जि.प.च्या शाळेत सर्व प्रकारचे शिक्षण मिळत आहे. आजच्या स्पर्धेची चांगली तयारी झाली आहे. येथील शिक्षक हुशार असल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवीत असल्याचे सांगून केंद्रातील सर्व शाळेने आपला विद्यार्थी पट वाढण्याची महत्वपूर्ण सुचना शेवटी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अनिल नागोठकर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading