जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ! कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Gavathi Daru Japt
रायगड :
विधानसभा निवडणूक सन 2024 च्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दि.15 ऑक्टोबर 2024 ते दि. 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 324 गुन्हे नोंदविण्यात आलेले असून 240 आरोपीना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईमध्ये 1 लाख 58 हजार 531  लि.दारु जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 1 कोटी 1 लाख 90 हजार 497 आहे.
विधानसभा निवडणुक-2024 आचारसंहिता कालावधीत या विभागाची  7 पथक तैनात असून  पथकांकडून  आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हयात बेकायदेशीर हातभट्टी  दारु  निर्मिती  व विक्री  केंद्र यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच  कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार याकरीता रायगड विधानसभा मतदारसंघात  शेडूंग,ता-पनवेल, व चांढवे,ता-पोलादपूर येथे 2 तपासणी नाके उभारण्यात आले असून तेथे संशयित  वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. 
अवैध मद्यविक्री करणारे ढाबे/हॉटेल/टपऱ्या यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असून  अशा हॉटेल/ढाबे मालक /चालक  यांच्यासह जागा मालकांवर गुन्हे नोंद करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच या निवडणूक  कालावधीत गोवा राज्यातून  गोवानिर्मित मद्याची चोरटी वाहतूक रेल्वे प्रशासनाच्या  रो-रो सेवेव्दारे वाहतूक  होण्याची शक्यता असल्याने कोलाड येथे रो-रो रेल्वे सेवेव्दारे येणाऱ्या वाहनांची  पोलीस विभाग  व  रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तपासणी करण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक 2024 मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनांस आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस ॲप क्र. 8422001133 व टोल फ्रीक्र.18002339999 वर संपर्क  संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading