जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळाव्यांचं आयोजन; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण

Mukhyamantrikarya Prashikshan Yojana

अलिबाग :

रायगड जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत विविध मेळावे आयोजित केले जाणार आहेत. या मेळाव्यांमध्ये उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या १०% आणि सेवा क्षेत्रातील आस्थापनांमध्ये २०% रिक्तपदे उपलब्ध करून दिली जातील. या मेळाव्यात विविध खाजगी आस्थापनांचा सहभाग असणार आहे.
रोजगार मेळाव्यांचे स्थळ आणि दिनांक पुढीलप्रमाणे:
२३ सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेण यांच्या मार्फत रामवाडी, पेण (वेळ: १० ते १५ वा.)
२४ सप्टेंबर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल (वेळ: १० ते १५ वा.)
२५ सप्टेंबर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत (वेळ: १० ते १५ वा.)
२६ सप्टेंबर: जे. एस. एम. कॉलेज, अलिबाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अलिबाग (वेळ: १० ते १५ वा.)
२६ सप्टेंबर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड (वेळ: १० ते १५ वा.)
२७ सप्टेंबर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण (वेळ: १० ते १५ वा.)
३० सप्टेंबर: औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे (वेळ: १० ते १५ वा.)
या मेळाव्यांमध्ये निवडलेल्या उमेदवारांना ६ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागेल आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कौशल्य विकास विभागाकडून शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन देण्यात येईल. उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि ऑनलाईन अर्ज सादर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading