कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील देवकान्हे येथे पारंपरिक व ऐतिहासिक पद्धतीने व अनादी काळापासून चालत आलेली कार्तिकी शु दुवादशी(बार्शी) म्हणजेच ग्रामीण भागातील नागरिक याला वाघबार्शी असे म्हणतात तर हा उत्सव आराध्य ग्राम दैवतांचा पालखी सोहळा व परंपेनुसार तुलसी विवाह सोहळा हा उत्सव विविध धार्मिक तसेच विधिवत पद्धतीने येथील ग्रामस्थ मोठया उत्साहात साजरा करतात तसेच उत्सवाचा भक्तिमय वातावरनाचा आनंद लुटतात. तर तालुक्यातील ऐतिहासिक परंपरा म्हणन देवकान्हे गावात हा सोहळा पाहण्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील विविध भागातील भक्तगण येतात.
बुधवारी ता. १३ नोव्हे रोजी यावेळी विविध धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने ग्राम दैवाची महापूजा तसेच जलाभिषेक तसेच पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह सोहळा मोट्या उत्साह वातावरणात या ठिकाणी साजरा करत याला जणू काही या गावात यात्रेच्याच स्वरूपाच रूप आले होते त्याच प्रमाणे पालखी सोहळा ढोल ताश्यांच्या व खाळू बाजाच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत गावातील घरा घरात कुटुंबाला पालखीचे दर्शन देत दैवताची पूजा आरती करत हा पारंपरिक पद्धतीचा सोहळा अनेक विविध कार्यक्रमाने ग्रामस्त महिला व तरुण युवक युवती एकत्रित येऊन मोठ्या उत्साह वातावरणात व तुलसी विवाह सोहळा सालाहाबदप्रमाणे साजरा करत भक्तीमय वातावरणात आनंद लुटला.