रायगड जिल्ह्यातील पंधराव्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. आज, 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले. यावेळीही रायगड जिल्ह्यातील मतदारांनी जुन्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनाच विजयाचा कौल दिला आहे.
192 – अलिबाग
शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांनी 29,565 मतांनी विजय मिळवला. त्यांनी शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पराभूत केले.
194 – महाड
शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी शिवसेना उबाठाच्या नवख्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्यावर 26,210 मतांनी मात करत विजयी झाल्याचे चित्र समोर आले.
193 – श्रीवर्धन
अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांनी 82,798 मतांनी मोठा विजय मिळवत शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांना पराभूत केले.
191 – पेण
भाजपचे रवींद्र पाटील यांनी 60,810 मतांनी प्रसाद भोईर यांचा पराभव करत विजय प्राप्त केला.
189 – कर्जत
शिंदे गटाचे महेंद्र थोरवे यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना 5,694 मतांनी हरवत विजय मिळवला.
188 – पनवेल
भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना 51,091 मतांनी पराजित केले.
190 – उरण
भाजपचे महेश बालदी यांनी शेकापचे प्रीतम म्हात्रे यांचा 6,512 मतांनी पराभव करत विजय मिळवला.
जुन्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास
रायगड जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये निवडून आलेले उमेदवार हे प्रस्थापित नेतृत्वातील असून मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. नव्या पक्षीय फेरबदलांनंतरही अनेक नेत्यांनी आपला बालेकिल्ला टिकवून ठेवला. यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण जुन्या आणि अनुभवी नेत्यांच्या नेतृत्वाखालीच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट होते.
या निकालांमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय रंगत वाढली असून, आगामी काळात हे नेतृत्व कशा प्रकारे जिल्ह्याचा विकास घडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.