रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या फ्लिटरमध्ये माती आणि छोट्या छोट्या अळ्या असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या आणि नातेवाईक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बाह्य रुग्ण आणि अंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी फ्लिटरची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे.
जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या आंतर रुग्ण इमारतीमध्ये असणाऱ्या काहीं फिल्टरमध्ये माती सहित अळ्या आढळून आल्या आहेत. त्याचप्रमाणे नवजात शिशू यांच्या विभागात असणाऱ्या फिल्टरची पाहणी केली असता त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात माती आढळून आली. सदर फ्लिटरची पाहणी करीत असताना तेथे असणारे रुग्ण आणि नातेवाईक यांनी सांगितले की सदर पाण्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येत आहे. हे पाणी आम्ही किंवा नवजात अर्भक माता यांनी पिले ते आम्हाला ही उलट्या जुलाब सारखे रोग होऊ शकतात. रुग्णालय हे औषधोपचार साठी आहे का येथून रोगाचा प्रसार व्हावा यासाठी आहे हे कळत नाही. आमची खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परिस्थिती नसल्याने आम्ही येथे आलो आहे.
पाण्यात येणाऱ्या वादाबदल येथील कर्मचारी यांना सांगितले असता ते कानाडोळा करीत असतात. आम्ही वाद केला तर आमच्या रुग्णाला त्रास होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे अशी माहिती रुपाली भाटे यांनी दिली आहे.
————————————————–
काल रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास मी घरी असताना मला रुग्णालयातून एका रुग्णाच्या नातेवाईकाने कॉल करून सांगितले की, जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात असणाऱ्या अती दक्षता विभागाच्या बाहेर असणाऱ्या फिल्टर मधून पिण्यासाठी बाटलीमध्ये पाणी घेतले असता त्यामध्ये छोटे छोटे किडे आणि माती दिसत आहे. याची खातर जमा करण्यासाठी रुग्णालयात गेलो असता तिथे त्या रुग्णाच्या नातेवाईक याची भेट घेऊन बाटली बघितली असता त्यामध्ये काही किडे आणि तळाशी माती असलेली दिसली.-
सागर पेरेकर, सामाजिक कार्यकर्ते. अलिबाग.
————————————————–
जिल्हा रुग्णालयातील फिल्टरची त्वरित स्वच्छता करून घेतली जाईल आणि काही ठिकाणी फ्लिटर खराब झाले असतील ते सुद्धा बदलण्यात येतील. आणि दोन दिवसाआड सर्व फ्लिटरची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभाग कर्मचारी यांना देण्यात येतील.
…निशिकांत पाटील,
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक. जिल्हा रुग्णालय. अलिबाग रायगड.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.