
सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी मुनवली येथील हनुमान मंदिरात मुनवली ग्रामस्थ आणि जय हनुमान मित्र मंडळ मूनवली तर्फे रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ चे मानकरी अजित सिताराम हरवडे प्राथमिक शिक्षक रायगड जिल्हा परिषद शाळा सहाणगोठी आदिवासीवाडी, ता. अलिबाग यांचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला .
याप्रसंगी श्री.क्लासेस चोंढीचे संस्थापक संतोष राऊत सरांसह मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, शिवसेना(शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, प्रभाकर मोहिते, जगदीश बारे, सुनील अनमाने, सुधाकर मल्हार, दिलीप मोंढे, अशोक मसूरकर, राकेश पवार, सलमान कुर, माहिद कुर, साहिल शिरगावकर, रमीज कुर, अदू भगत, प्रशांत सकरे, निलेश नागावकर, प्रकाश गुळेकर, संजय सोनवणे, तसेच बहुसंख्येने इतर ग्रामस्थ महिलावर्ग आणि मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.