जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन

Yuva Mohotsav
अलिबाग :
युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येते. राज्यात सन 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयेाजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नेहरु युवा केंद्र व विविध प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर यांनी दिली आहे.
प्रत्येक स्तरावर विजयी होणारे युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी रायगड जिल्ह्यातील युवक युवतींना जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे माध्यमातून प्राप्त होणार आहे. संकल्पना आधारीत बाबींमध्ये“विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना” “INNOVATION IN SCIENCE AND TECHNOLOGY” यावर्षासाठी निश्चित केले आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयेाजित करण्यात येणार आहेत. तसेच प्राविण्य प्राप्त करणाऱ्या संघ, स्पर्धकांना प्रमाणपत्र व चषक देण्यात येवून विजयीसंघ पुढे पाठविण्यात येईल. तसेच युवांच्या भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेवून युवांना राष्ट्र निर्माणमध्ये सहभागी करुन त्यांची दूरदृष्‍टी विचारात घेणे आवश्यक आहे.
 या अनुषंगाने राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत विकसित भारत यंगलिडरर्स डायलॉग अंतर्गत 1)Tech for Viksit Bharat 2) Vikas Bhi Virasat Bhi 3) Empowering Youth for ViksitBharat 4) Making india the Vishwaguru 5) Making india the startup Capital of the world 6) Fit india–A means to Viksit Bharat 7) Making india the Global manufacturing powerhouse 8) Making indiaenergy efficient 9) Building the Infrastructure for the Future 10) Empowering Women and improvingsocial indicators संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत.
 प्रथम टप्पा  
Viksit Bharat Quiz वैयक्तिकरित्या युवांना सहभागी होता येईल. यासाठी प्रश्न मंजूषा स्पर्धा ही सामान्यज्ञान व भारताची कामगिरी या बाबींवर होणार आहे. माय भारत पोर्टलवर शैक्षणिक संस्था व कॉलेज यांनी सहभाग नोदवावा. ही स्पर्धा 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 याकालावधीत होणार आहे. सहभागासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल. व्दितीय टप्पा:- विकसित भारत यावर निबंध लेखनस्पर्धा घेतली जाईल शब्द मर्यादा 1000 शब्दाची राहील वरील 10 संकल्पनेवर निबंध लेखन करता येईल. निबंध स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने दि. 8 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. सहभागासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल.  तृतीयटप्पा:- viksit Bharat PPT Challange वर नमूद केलल्या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातून 4 युवांची निवड करण्यात आहे. निबंध माय भारत पोर्टलवर अपलोड करावयाचे आहेत.  दि 20 ते 26 डिसेंबर 2024 या कालावधित ही स्पर्धा होणार आहे.  चतुर्थ टप्पा:- राष्टीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवांना प्रथम दि. 11 जानेवारी 2025 रोजी सादरीकरण करावे लागेल यामधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या युवांना भारत देशाचे मा.पंतप्रधान महोदय यांच्या समोर दि 12 जानेवारी 2025 रोजी सदर सादरीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय युवामहोत्सवसाठी राज्याचे 10 युवा आयकॉन पाठविण्यात येणार असून जिल्हा स्तरावरुन विभागस्तरावर 5 निवडक युथआयकॉन पाठविण्यात येणार आहेत.
वयोगट व सहभागाची पात्रता 
या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी 15 ते 29 वर्षे वयोगट राहील. (दि. 12 जानेवारी 2025 रोजी परिगणना करण्यात येईल.), जिल्ह्यातील इंजिनिअरींग कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकिय महाविद्यालय, कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ,युवा मंडळ तसेच 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवांना सदर युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणीचा अंतिम दि. 2 डिसेंबर 2024 राहील. युवा महोत्सवाचे आयेाजन दि.04 डिसेंबर 2024 रोजी करण्यात येईल. नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज संपूर्ण माहिती भरुन फोटोसह स्कॅन करावे. स्कॅन PDF मध्येकरावे व dsoraigad.2009@rediffmail.com या ईमेल वर दि. 2 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत सादर करावे. सोबत स्पर्धेची माहिती नियमावली व नोंदणीसाठी अर्जाचा विहीत नमुना देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 9511707103 या क्रमांकावर संपर्क साधावा.
बाबनिहाय सहभागी संख्या 
संकल्पना आधारीत स्पर्धा “विज्ञान व तंत्रज्ञान यामधिल नवसंकल्पना” “INNOVATION IN SCIENCE AND TECHNOLOGY” सहभाग संख्या-5,  सांस्कृतिक समुह लोकनृत्य सहभाग संख्या-10, लोकगीत 10, कौशल्य विकास कथा लेखन सहभाग संख्या-01,चित्रकला सहभाग संख्या-01,वक्तृत्व सहभाग संख्या-01,कविता सहभाग संख्या-01, फोटोग्राफी (जिल्हास्तर).  युथ आयकॉन महाराष्ट्र राज्याचे 10 युवा आयकॉन राष्ट्रीय युवा महोत्सवसाठी पाठविण्यात येतील सहभाग संख्या-5
युथ आयकॉनसाठी शिफारस करणा-या युवांसाठी माहिती नमुना-अ.क्र नाव व पत्ता ईमेल आयडी व संपर्क क्रमांक युवांनी केलेल्या कार्याची संक्षिप्त माहिती अंदाजित 2000 शब्दात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading