
नागोठणे ( महेंद्र माने ) :
पोलिस ठाणेच्या सभागृहात शनिवार 14 सप्टेंबर रोजी रविंद्र दौंडकर उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा उपविभाग यांचे अध्यक्षतेखाली सोमवार 16 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद व मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्थी गणेशमुर्ती विसर्जन या सणाचे अनुषंघाने पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी सदस्य, व्यापारी, पत्रकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्तपणे घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वांनी जातिय तथा सामाजिक सलोखा राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन रविंद्र दौंडकर यांनी केले.
यावेळी उपसरपंच अकलाक पानसरे, मा.सरपंच डॉ.मिलिंद धात्रक, ग्रा.प.सदस्य – ज्ञानेश्वर साळुंखे व प्रकाश कांबळे यांच्यासह नाझिम नालखंडे, निलोफर पानसरे, राजेश्री टके, कीर्तीकुमार कळस,संजय काकडे,सिराज पानसरे,सुनील कुथे,संतोष कावेडीया,नितिन राऊत,आसिफ मुल्ला,राजेंद्र गुरव, गुन्हा शाखेचे विनोद पाटील तसेच सर्व शांतता कमिटी सदस्य, व्यापारी प्रतिनिधी व गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
————————————————-
उपस्थितांना मार्गदर्शन करताना रविंद्र दौंडकर यांनी या उत्सव काळात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच कोणीही सोशल मिडीयावर फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम किंवा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे धार्मिक/जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज/फोटो/व्हिडीओ/कमेंट्स शेअर किंवा पोस्ट करू नका. असे मेसेज पोस्ट किंवा शेअर केल्यास तसेच कोणत्याही इतर मार्गे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास सबंधीतांवर तसेच सदर ग्रुपचे ग्रुप अॅडमीन यांचेवरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्वांनी जातिय तथा सामाजिक सलोखा राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन दौंडकर यांनी करून या सर्व गोष्टींवर सायबर सेलचे विशेष पथक सोशल मिडीयावर लक्ष ठेवुन असल्याचे शेवटी दौंडकर यांनी सांगितले. यावेळी नागोठणे सहा. पो.नि. सचिन कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले उपस्थितांचे आभार विनोद पाटील यांनी केले.