जागृत नागरिकांनी मिळालेली सोन्याची चेन केली पोलीस ठाण्यात जमा

Panvel Police Chain Return

पनवेल ( संजय कदम ) :
रस्त्यामध्ये चालताना मिळालेली जवळपास 7 ग्रॅम वजनाची चेन प्रामाणिकपणे दोन इसमांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात येवून जमा केल्याने या दोघांचे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने कौतुक करण्यात आले.
अंकुश इंगळे व संतोष कोळेकर हे दोघे करंजाडे परिसरातून पायी जात असताना त्यांना रस्त्यात जवळपास 7 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पडलेली दिसली. तात्काळ त्यांनी ती ताब्यात घेवून चौकशी केली असता. सदर चेनचा कोणीही मालक मिळून न आल्याने त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात येवून सदर चेन ही वपोनि नितीन ठाकरे व इतर अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत ताब्यात दिली.
या प्रामाणिकपणाचे वपोनि नितीन ठाकरे यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading