पनवेल ( संजय कदम ) : जागतीक पोलिस फायर गेम्स 2023 कॅनडा विनीपेग या ठिकाणी 28 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये श्री सुभाष पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमध्ये १७२ सें.मी. उंची गटामधे सिल्वर मेडल मिळवले तसेच मेन फिजिक्स या प्रकारामध्ये ब्रांझ मिडल मिळविलेआणि महाराष्ट्र पोलीस दलाचे भारतीय पोलीस दलाचे व देशाचे नाव उंचावून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला.
सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज सात तास मिस्टर ऑलिम्पिया श्री सुनीत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनअबॅाव जिम नेरुळ ,अंधेरी,कोअर जिम खारघर या ठिकाणी सराव करीत होते. या स्पर्धेसाठी 65 देशातील संघानी व 5700 खेळाडुनी सहभाग नोंदविला. (11-07-2023 रोजी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या हस्ते दिल्ली येथे सत्कार होणार आहे)
या स्पर्धेसाठी त्यांना चेतन पाठारे वर्ल्ड बॉडीबिल्डींगचे सेक्रेटरी ,विक्रम रोठे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग लिगल अँडव्हायझर व प्रशांत स आपटे साऊथ एशिया बॉडीबिल्डिंग संघटनेचे अध्यक्ष , पत्नी रागिणी पुजारी, आनंद गुप्ता व विवेक गुप्ता संचालक गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी खालापूर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यापूर्वी त्यांनी जुलेै २०२२ मालदिव येथे झालेलया मिं एशिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये Gold मेडल मिळवले आहे. ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते.तसेच सलग तीनवेळा भारतश्री व महाराष्ट्र श्री हा किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस महासंचालक रजनीश शेठ सर डॉ.भूषणकुमार उपाध्याय, विवेक फणसाळकर पोलीस आयुक्त मुंबई, मिलिंद भारंबे पोलिस आयुक्त नवी मुंबई, विनय कारगांवकर सेवानिवुत पोलिस महासंचालक, निखिल गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य, एस जयकुमार पोलीस सहआयुक्त प्रशासन मुंबई शहर, निसार तांबोळी साहेब पोलिस महानिरिक्षक (प्रशासन ), दिलीप सावंत सर अप्पर पोलीस आयुक्त मुंबई शहर, संजय जाधव अॅडिशनल पोलिस कमिशनर ठाणे शहर, संजय पाटील पोलीस उपायुक्त मुख्यालय नवी मुंबई, खासदार धैर्यशील माने कोल्हापूर, आमदार प्रशांत ठाकूर पनवेल, आमदार रोहित पवार, परेश ठाकूर सभागृह नेता पनवेल महापालिका, प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेता पनवेल महापालिका.
तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.