अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील जय हनुमान क्रीडा मंडळ मुनवली पुरस्कृत ‘घाडी बंधु चषक २०२५’ च्या क्रिकेटच्या भव्य स्पर्धांचे दि.११ व १२ जानेवारी २०२५ रोजी मुनवली येथील भव्य क्रिकेट मैदानावर आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेमध्ये अलिशान सोगाव संघाने दादरेश्वर जांभूळपाडा ‘ब’ संघाचा पराभव करत अलिशान सोगाव संघाने ‘घाडी बंधु चषक २०२५’ वर प्रथम क्रमांकाचे नाव कोरले.
जय हनुमान क्रीडा मंडळ मुनवली पुरस्कृत ‘घाडी बंधु चषक २०२५’ या स्पर्धांचे उद्घाटन रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्याहस्ते व सातिर्जे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाऊ ठाकूर, अलिबाग क्रिकेट अकॅडमीचे ऋषिकेश राऊत तसेच माजी मापगाव ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश वडे, बाळाराम थळे, सुरेश राऊत, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, ज्येष्ठ नागरिक गोविंद अनमाने, सुधाकर ठकरूळ, मधुकर सूद, दिलीप मोंढे, सुरेश हाके, संतोष बांद्रे, मनिष खाडे, रुपेश अनमाने, सूचित थळे, मुनवली महिला मंडळाच्या महिला अध्यक्षा संगीता मल्हार, मापगाव विभाग बचत गट प्रमुख शलाका थळे, अहिल्याबाई होळकर पुरस्कार विजेती सुप्रिया ठकरूळ, वर्षा अनमाने, व इतर महिला वर्ग मुनवली, सोगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यास्पर्धेत एकूण २२ नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत अंतिम सामना अलिशान सोगाव व दादरेश्वर जांभूळपाडा ‘ब’ या संघामध्ये होऊन अटीतटीच्या लढतीत अलिशान सोगाव संघाने खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक ३०,००० रुपये व आकर्षक चषक पटकावला, तर दादरेश्वर जांभूळपाडा ब संघाने द्वितीय क्रमांक १५,००० रुपये व आकर्षक चषक पटकावला, तसेच गावदेवी वायशेत संघाने तृतीय क्रमांक ८,००० रुपये व आकर्षक चषक पटकावला.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजचा मान दादरेश्वर जांभूळपाडा ‘ब’ संघाचा चंद्रकांत पाटील याने पटकावले तर उत्कृष्ट गोलंदाजचा मान म्हणून गावदेवी वायशेत संघाचा प्रिन्स याने पटकावले, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चा मान म्हणून अलिशान सोगाव संघाचा कामरान कुर याला देऊन गौरविण्यात आले. सामनावीर म्हणून अलिशान सोगाव संघाचा आरिफ कुर याचा सत्कार करण्यात आला, या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सामनादरम्यान खेळामध्ये उत्कृष्ट कसब दाखविणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना अल्पेश मल्हार व अतिष मल्हार यांच्यावतीने आकर्षक टी शर्ट देण्यात आले.
स्पर्धेच्या शेवटी बक्षीस समारंभ रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे, माजी जि. प. सदस्य काका ठाकूर यांच्या हस्ते व सातिर्जे ग्रामपंचायत माजी उपसरपंच उमेश ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, अनिल जाधव, चंद्रकांत खोत, संजय शिंदे, विवेक जोशी, संजय अनमाने, मधुकर सूद, सूचित थळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, प्रविण घाडी, तसलीम कप्तान, तौसिफ कप्तान, साहिल कुर, अरविंद मसुरकर, अशोक मसुरकर, महिला मंडळ मुनवली तसेच मुनवली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा घर बसल्या पाहण्यासाठी ‘घाडी बंधु’ यांनी युट्यूब वर ‘ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह’ मार्फत थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. स्पर्धांसाठी मंडप व्यवस्था संजय अनमाने तर डिजेची व्यवस्था शैलेश तिर्लोटकर यांनी केली होती. स्पर्धेत सुहास फाटक, नदीम वाकनिस, यश मापगावकर, निखिल पडते यांनी उत्तमरीत्या समालोचन करत उपस्थितांची व थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. स्पर्धा काळात खेळाडूंना व आयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. आलेल्या सर्व मान्यवरांना ‘घाडी बंधु’ तर्फे शाल, श्रीफळ व पुष्परोप देण्यात आले.
यावेळी सर्व मूनवली ग्रामस्थांनी व मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना त्यांच्या सामाजिक कार्याची अनेक माध्यमांनी दखल घेत उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष नागरी सत्कार करण्यात आला. तसेच याचवेळी मुनवली येथील क्रीडांगण समपातळीकरण यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व युवा नेता सूचित थळे यांचा माजी जि. प. सदस्य काका ठाकूर यांनी कौतुक करत जाहीर सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व क्रिकेटप्रेमीं नागरिकांनी विजयी अलिशान सोगाव संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.