कोलाड (श्याम लोखंडे) :
रविवार दि.९ फेब्रुवारी २०२५ रोजी गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पर्व ५ यांच्या मान्यतेने जय हनुमान आंबेवाडी यांच्या तर्फे क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट सामन्यात श्री गणेश गोवे संघ अंतिम विजेता संघ ठरला.
या स्पर्धेचे उद्धघाटन प्रितमताई पाटील रोहा तालुका महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस, कुमार लोखंडे माजी उपसरपंच, निशिकांत पाटील सामाजिक कार्यकर्ते, सचिन परबळकर,मनोहर लोखंडे,संकेत लोखंडे तसेच गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष नितेश मुंडे,सेक्रेटरी शरद वारकर,उपसेक्रेटरी शिरीष दळवी, खजिनदार अंकेत खैरे उपखजिनदार रोशन पवार,वैभव जाधव, जय हनुमान आंबेवाडी संघाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
या क्रिकेट सामन्यात श्री गणेश गोवे प्रथम,गावदेवी नडवली द्वितीय,सोमजाई तिसे तृतीय,तसेच गावदेवी किल्ला चतुर्थ क्रमांकाचे मानकरी संघ ठरले सर्व विजेता संघास सामाजिक कार्यकर्ते शरद परबळकर, माजी उपसरपंच श्रीकांत चव्हाण,स्वप्नाली इंटरप्राईजेस,विशाल लाड, दिनेश लोखंडे, कल्पेश भालेकर यांच्या शुभेहस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले,तसेच मालिकावीर विनय दहिंबेकर,उत्कृष्ट फलंदाज प्रज्योत जाधव तसेच उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
सर्व क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी जय हनुमान आंबेवाडी क्रीडा मंडळाचे दर्शन लोखंडे, श्रीकांत लोखंडे,विकास लोखंडे,तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.