जयंत पाटील सभागृहात नाहीत पण..भविष्यात त्यांची जागा चित्रलेखा पाटील घेतील : राजू शेट्टी

Raju Shetty
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विधान परिषदेत लढा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे रायगडच नव्हे, तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज,  त्यांनी विधान परिषदेत शेतकरी आणि कार्यकर्त्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, आता हा आवाज विधान परिषदेत घुमणार नाही, याचे प्रचंड दुःख असल्याचे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कुरुळ येथे पीएनपी चषकाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
पीएनपी चषकाची भव्यता पाहून त्याचे आयोजक नृपाल पाटील आणि चित्रलेखा पाटील यांचे कौतुक वाटते, असेही राजू शेट्टी म्हणाले. प्रभाकर पाटील यांच्या विचारांची पुढील पिढीने प्रतारणा न करता काम सुरू ठेवल्याचा अभिमान वाटतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, याची खात्री असून अशा उपक्रमांमुळे रायगड जिल्ह्यातील खेळाला चांगले प्रोत्साहन मिळत आहे.
यावेळी जयंत पाटील यांनीही पीएनपी चषकाचे परदेशातही प्रेक्षक असल्याचे सांगत या स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. तर, चित्रलेखा पाटील यांनी पीएनपी चषक हे मातीतल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. स्व. प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित केली जात असून, भविष्यातही नवोदित खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न राहील, असे त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading