जन्मताच ऐकू येत नसलेल्या चिमुकलीला सुधाकर घारे यांचा श्रवण यंत्रासाठी मदतीचा हात…

Sudahkar Ghare

कर्जत ( गणेश पवार ) : 

माथेरानमध्ये राहणार कुमारी द्रीती अनिकेत उतेकर वय दीड वर्षे या चिमुकलीला जन्मताच दोन्ही कानाने ऐकायला येत नसलेल्या व वडिलांचे छत्र हरपलेल्या या कर्णबधिर चिमुकलीला लाख रूपये किमतीचे श्रवण यंत्र घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर भाऊ घारे यांनी लाख रुपयाचा धनादेश देत, या चिमकलीच्या पुढील भविषातील अडचणी दूर करण्याप्रति मदतीचा हात पुढे करत सुधाकर भाऊ घारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.
कुमारी द्रीती अनिकेत उतेकर वय दीड वर्षे ही माथेरान मधील पंचवटी नगर येथे राहाणार असुन, सदर चिमुकलीला जन्मताच दोन्ही कानाने ऐकायला येत नसलेल्या, व या चिमुकलीच्या वडीलांचे ती दहा महिन्याची असतानाच हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले असल्याने, या चिमुकलीच्या कानावर शस्त्रक्रिया करणे किंवा तिला लागणारे महागातले श्रवण यंत्र घेणे देखील तिच्या आईच्या आवाकाच्या बाहेर असल्याने, सध्या या चिमुकलीला थेरिफी व्दारे बोलने तसेच ऐकायला शिकण्याकरिता आई प्रियंका अनिकेत उतेकर या आपल्या चिमुकल्या द्रीती हीला मुंबई वाडिया हॉस्पिटल येथे घेऊन जात आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे या चिमुकलीला श्रवणयंत्राची अत्यंत गरज असल्याने, सदर मुलीच्या आईने त्यांची परस्थिती नसल्याने महागडे श्रवणयंत्रासाठी मदतीची अपेक्षा ही माथेरान प्रेस क्लबकडे बोलून दाखवली होती.
ल यानुसार माथेरान येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर भाऊ घारे सुधाकर हे उपस्थित असताना. सुधाकर भाऊ घारे यांची माथेरान व कर्जत प्रेस क्लबच्या पत्रकारांनी भेट घेऊन या चिमुकली संदर्भात माहिती देत आपल्या माध्यमातून या चिमुकलीला आपल्या माध्यमातून श्रवणयंत्रांची मदत मिळावी अशी विनंती करण्यात आली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सुधाकर भाऊ घारे यांनी आपण त्या मुलीला व तिच्या आईला घेऊन कर्जतला या व ज्या कंपनीचे श्रवण यंत्र आहे त्या कंपनीचा धनादेश तात्काळ घेऊन जावा असा शब्द दिला होता.
यानुसार शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे एका कार्यक्रमा दरम्यान सदर चिमुकली व तिची आई प्रियंका उतेकर यांचे कडे एक लाख नऊ हजाराचा धनादेश तिच्या सुपूर्त केला आहे. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुधाकर भाऊ घारे यांनी लाख रुपयाचा धनादेश देत, या चिमकलीच्या पुढील भविषातील अडचणी दूर करण्याप्रति मदतीचा हात पुढे करत सुधाकर भाऊ घारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले असल्याने या चिमुकलीच्या आईने सुधाकर भाऊ घारे व पत्रकार यांचे मनापासुन आभार मानले.
—————————————-
मी दानशूर सुधाकर भाऊ घारे साहेब यांच्या दानशूर वृत्ती बद्दल अत्यंत भाऊक मनाने आभार मानत आहे. तसेच माथेरान व कर्जत प्रेस क्लबचे देखील धन्यवाद मानत आहे. कारण आज दानशूर सुधाकर भाऊ घारे यांच्या मदतीने माझ्या मुलीला मिळालेल्या श्रवण यंत्राद्वारे आपली मुलगी बोलू व ऐकू शकेलं,
…प्रियंका अनिकेत उतेकर, द्रीती ची आई

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading