उरण (विठ्ठल ममताबादे ) :
भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर, जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणास (जनेप प्राधिकरण) महामहिम महाराज बेल्जियम यांच्या प्रतिनिधी, महामहीम राजकुमारी अॅस्ट्रिड यांच्या अधिकृत भारत भेटीदरम्यान, त्यांचे आदरातिथ्य करण्याचा बहुमान मिळाला. जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., यांनी प्रतिष्ठित व्यावसायिक शिष्टमंडळासह महामाहिम राजकुमारी यांचे हृद्य स्वागत केले.
शिष्टमंडळाचे स्वागत करताना, जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., यांनी जनेप प्राधिकरणाचे कामकाज, पायाभूत सुविधा विकास आणि भारताच्या सागरी व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सज्ज असलेला एक परिवर्तनशील उपक्रम असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाचा सर्वसमावेशक आढावा घेतला.
जनेप प्राधिकरण आणि एपेक-अँटवर्प/फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणे हा या भेटीचा निर्णायक क्षण होता. हा करार भारतात बंदर-केंद्रित प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा पाया रचतो, ज्यामुळे सागरी शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी जनेप प्राधिकरणाच्या प्रयत्नांना बळकटी मिळते.
या प्रसंगी बोलताना, जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से., म्हणालेः “बेल्जियमच्या महामहिम राजकुमारी अस्ट्रिड आणि प्रतिष्ठित शिष्टमंडळाचे यजमानपद जनेप प्राधिकरणाने भूषवणे ही सन्मानाची बाब आहे. हा दौरा भारत आणि बेल्जियम यांच्यातील दृढ सागरी संबंधांची पुष्टी करतो. एपीईसी-अँटवर्प/फ्लॅडर्स बंदर प्रशिक्षण केंद्रासोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे बंदर प्रचालन आणि प्रशिक्षण कार्यक्रमात उत्कृष्टता वाढवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. जनेप प्राधिकरण जागतिक भागीदारी वाढवण्यासाठी आणि सागरी क्षेत्रातील शाश्वत वाढीस चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे.”
या भेटीदरम्यान, महामहिम राजकुमारी आणि शिष्टमंडळाने जनेप प्राधिकरणाच्या ड्रेजिंग ऑपरेशनमध्ये सक्रियपणे सहभागी असलेल्या डीईएमई हॉपर ड्रेजिंग जहाज ‘कांगो रिव्हर’ला भेट दिली, जे जनेप प्राधिकरणाच्या कोस्टल बर्थ येथे उभे आहे. यावेळी नौवहन कार्यक्षमता वाढवण्याच्या जनेप प्राधिकरणाच्या प्रयत्नांची इत्यंभूत माहिती मिळवत, जहाजातील प्रगत ड्रेजिंग तंत्र आणि परिचालन क्षमतांचे निरीक्षण करण्याची संधी या शिष्टमंडळाला मिळाली. या भेटीने जनेप प्राधिकरणासाठी शाश्वत ड्रेजिंग उपायांमधील आपले कौशल्य आणि जागतिक दर्जाच्या बंदर पायाभूत सुविधा राखण्यासाठीची वचनबद्धता दर्शविण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम केले.
महामहिम राजकुमारी आणि शिष्टमंडळाने विद्यमान जनेप प्राधिकरण-एपीईसी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली, जिथे त्यांनी भारतातील कौशल्य विकास आणि सागरी प्रशिक्षण कार्यक्रम वर्धित करण्यावर चर्चा केली.
बेल्जियमच्या महामहिम राजकुमारी अस्ट्रिड यांचा जनेप प्राधिकरणाचा दौरा हा भारत-बेल्जियम सागरी सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे बंदर विकास, प्रशिक्षण आणि शाश्वत सागरी उपाययोजनांमध्ये भविष्यातील सहकार्याचा मार्गही मोकळा होईल.
या शिष्टमंडळात महामहिम श्री मॅक्सिम प्रीव्होट, उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार, युरोपियन व्यवहार आणि विकास सहकार्य मंत्री, संघीय शासन, महामहिम श्री मॅथियस डीपेंडेल, मंत्री-फ्लॅडर्स सरकारचे अध्यक्ष आणि फ्लेमिश अर्थमंत्री, नवोन्मेष आणि उद्योग मंत्री, परराष्ट्र व्यवहार, डिजिटायझेशन आणि सुविधा व्यवस्थापन, फ्लॅडर्स सरकार, महामहीम श्री डिडिएर वॅन्डरहॅसल्ट, बेल्जियम साम्राज्याचे भारतातील राजदूत, भारतातील बेल्जियम दूतावास, श्री फ्रँक गेर्केन्स, महावाणिज्यदूत, मुंबई, महावाणिज्यदूत बेल्जियम, मुंबई, श्री पीट डिमंटर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, फ्लॅडर्स इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेड, श्री क्रिस्टॉफ वॉटरशूट, व्यवस्थापकीय संचालक, पोर्ट ऑफ अँटवर्प-ब्रूजेस इंटरनॅशनल, राजदूत श्री डर्क वॉटर्स, महामहिम राजकुमारी अस्ट्रिड यांचे सल्लागार, रॉयल पॅलेस, श्री ल्यूक अर्नोट्स, संचालक आंतरराष्ट्रीय संबंध, पोर्ट ऑफ अॅटवर्प-बुजेस, श्री ग्रॅम वांडेपिट. क्षेत्र व्यवस्थापक दक्षिण आशिया, ड्रेजिंग, पर्यावरण आणि सागरी अभियांत्रिकी, राजदूत श्री डर्क वॉटर्स, महामहिम राजकुमारी अस्ट्रिड यांचे सल्लागार रॉयल पॅलेस आदी मान्यवरांचा सहभाग होता.