
जेष्ठ शिवसैनिक रविंद्र पाटील यांनी रस्त्यावर लोटांगण घालून “महाराज माफ करा” अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त
पेण :
मालवणमध्ये उभारलेल्या छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडल्याने छत्रपतींच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकार विरोधात शिवसेनेने पेण येथील शिवाजी चौकात आंदोलन केले.
यावेळी भ्रष्टाचारी भाजप सरकार हाय हाय, महाराजांच्या पुतळ्यामध्ये ही भ्रष्टाचार करणाऱ्यांचा निषेध असो, महाराज महाराजां बद्दल विवादास्पद भाष्य करणाऱ्या शिक्षण मंत्री दीपक केसरकर माफीमागा अश्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
पेणमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णु भाई पाटील यांच्या मार्गदर्शनात आत्मक्लेश आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. या आंदोलनात जेष्ठ शिवसैनिक रविंद्र पाटील यांनी रस्त्यावर लोटांगण घालून “महाराज माफ करा” अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. सरकार सत्तेतुन पैसा आणि पैश्यातन सत्ता मिळवीत आहे. गटार आणि रस्त्यावर फोफाळनार भ्रष्टाचार आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत या भ्रष्टाचारी सरकारने आणून ठेवला आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत असे सांगत महाराजांची माफी मागत रविंद्र पाटील यांनी हे आत्मक्लेश आंदोलन केले.
यावेळी यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू भाई पाटील, शिवसेना समन्वयक नरेश गावंड, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, रविंद्र पाटील, भगवान पाटील, जीवन पाटील, प्रवीण पाटील, तुकाराम म्हात्रे, वैशाली समेळ, नरेश सोनावणे, असाद अली आखवारे योगेश पाटील, सुहास पाटील यांसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.