चौल केंद्रस्तरीय व्यक्तिमत्त्व विकास व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Raju Patil
अलिबाग : 
रेवदंडा: चौल केंद्रातील केंद्रस्तरीय व्यक्तिमत्त्व विकास व क्रीडा स्पर्धा शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 रोजी रा. जि. प. शाळा रेवदंडा येथे जल्लोषात संपन्न झाल्या. या कार्यक्रमात केंद्रातील 11 शाळांमधील सुमारे 250 विद्यार्थी, शिक्षक, व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा येथील सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी सपत्नीक केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी कार्यगट सदस्य, लेखक व प्राध्यापक जयवंत पाटील यांनी हजेरी लावली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व पालक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात  राजेंद्र पाटील, केंद्रप्रमुख चौल यांनी प्रास्ताविकातून केली. दिवसभर विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या, जिथे खालील शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली:
समूहनृत्य
लहान गट: थेरोंडा नं. 2
मोठा गट: चौल आग्राव
समूहगीत गायन
लहान व मोठा गट: वरंडे देवघर
पथनाट्य
लहान व मोठा गट: थेरोंडा नं. 2
शिल्पकला
लहान गट: थेरोंडा नं. 2
मोठा गट: वरंडे देवघर
क्रीडा स्पर्धा
लगोरी: लहान गट – थेरोंडा नं. 2, मोठा गट – चौल
लंगडी (मुली): लहान व मोठा गट – थेरोंडा नं. 2
नेमधरणे: लहान गट – थेरोंडा नं. 2, मोठा गट – चौल
दोरा उड्या: लहान गट – वरंडे देवघर, मोठा गट – थेरोंडा नं. 2
सर्व विजेत्या शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संदीप पाटील (शाळा चौल आग्राव) यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading