महाराष्ट्र विधानमंडळाला देशात आगळीवेगळी अशी प्रतिष्ठा आहे अनेक क्षेत्रातील उद्देश पातळीवर नेतृत्व देणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्र विधानमंडळाने राष्ट्राला आतापर्यंत दिल्या आहेत महाराष्ट्र विधानमंडळाने लोकशाही आणि सत्तेच्या विकेंद्री करणाद्वारे सबळ प्रशासनाचा आदर्श इतरांना घालून दिला आहे या महाराष्ट्र विधानमंडळात चौदाव्या विधानसभेपेक्षा पंधराव्या विधानसभेत नवोदित राजकीय तरुणांचे चेहरे सर्वाधिक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या चौदाव्या विधानसभेत निवडून आल्यानंतर सन २०१९ स*** १५ राजकीय पक्ष व १६ अपक्षांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र पंधरा व्या विधानसभे मधील चित्र मात्र यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता असून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फुट राजकीय पक्षांमध्ये वाढलेले हेवेदावे, आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच जिल्ह्यात समाजात झालेली राजकीय सुडाची भावना, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका, बेरोजगारी ,प्रदूषणाचे मुद्दे, रखडलेले प्रकल्प, व विकासाच्या मुद्द्यावर अनेक नवोदित तरुण वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडून व अपक्ष म्हणून पंधराव्या विधानसभेत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या चौदाव्या विधानसभेत सन २०१९ स*** झालेल्या नोंदीप्रमाणे. असणाऱ्या पक्षांची व त्यांच्या सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे; भारतीय जनता पक्ष १०५ सदस्य संख्या शिवसेना पक्ष ५६ सदस्य संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ५४ सदस्य संख्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ४४ सदस्य संख्या हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी ३ सदस्य संख्या समाजवादी पक्ष २ सदस्य संख्या ऑल इंडिया मज लिस् इथे हादुल मुस्लिमिन पक्ष सदस्य संख्या २
बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष सदस्य संख्या २ राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष सदस्य संख्या १ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी माकप) . पक्ष सदस्य संख्या १ शेतकरी कामगार पक्ष सदस्य संख्या १ स्वाभिमानी पक्ष सदस्य संख्या १ महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष सदस्य संख्या १ विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती पक्ष सदस्य संख्या १ क्रांतिकारी शेतकरी पक्ष सदस्य संख्या १ अपक्ष सदस्य संख्या १३ असे महाराष्ट्र विधान मंडळात चौदाव्या विधानसभेत २८८सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये १३ अपक्ष असणाऱ्या सदस्यांची मतदार संघ निहाय नावे पुढीलप्रमाणे;
६५गोंदिया विधानसभा मतदारसंघ – विनोद अग्रवाल २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ प्रकाश कल्लप्पा आवाडे
५ साखरी अनुसूचित .ज मतदारसंघ. – मंजुळा तुळशीराम गावित
१४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ गीता भरत जैन
५९ रामटेक विधानसभा मतदारसंघ आशिष नंदकिशोर जयस्वाल
७१ चंद्रपूर अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ – किशोर गजानन जोरगेवार २० मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ – चंद्रकांत निंबा पाटील
२८० शिरोळ विधानसभा मतदारसंघ – राजेंद्र श्यामगोडा पाटील (यड्रावकर) १९० उरण विधानसभा मतदारसंघ – महेश बालदी
६१ भंडारा अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ – नरेंद्र भोजराज भोंडेकर
२४६ बार्शी विधानसभा मतदारसंघ – राजेंद्र विठ्ठल राऊत
३७ बडनेरा विधानसभा मतदारसंघ – रवी गंगाधरराव राणा
२४४ करमाळा विधानसभा मतदारसंघ – संजय विठ्ठलराव शिंदे
हे सदस्य चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून आले होते
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.