चैत्र महिना सुरू होताच जत्रोत्सवाला प्रारंभ, ठिक ठिकाणी यात्रा

Jatra
कोलाड (श्याम लोखंडे ) :
भारतीय हिंदू संस्कृती परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात तसेच जिल्हा, तालुका, पातळीवर तसेच गाव पातळीवर मराठी महिन्याला प्रारंभ होताच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आनंदाने भक्तिमय वातावरणात संपन्न होत असताना दिसत आहेत तर काही ठिकाणी हेच उत्सव भक्तीच्या ओघातून धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमानिमित्ताने काही ठिकाणी मंदिरातील नवीन मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना, वर्धापन दिन तर कुदैवत वर्धापन दिन असे उत्सव साजरे होत आहेत तर यात्रा आणि जत्रा परंपरेनुसार साजरे करण्यात येतात त्यामुळे या यात्रा जत्रा पालखी उत्सव सोहळा उत्साहात चैत्र महिन्यात प्रारंभ झाला आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील गावागावांत जत्रांचा हंगाम सुरूं झाला. गुढीपाडव्यानंतर ठिक ठिकाणी देव देवतांचे पूजा आरती तसेच परिसरातील यात्रा-जत्रांना सुरुवात झाली असून पारंपरिक पद्धतीने पूजा, पालखी, मिरवणुकीसह विधिवत पद्धतीने इतर विधी पार पाडले जातात.तर काही ठिकाणी मोठे मोठे जत्रो उत्सव आनंदाने साजरे करण्यात येतात.
तर विशेष म्हणजे आगरी-कोळी समाजांचे आराध्य दैवत म्हणून कार्ला गडावर असलेल्या एकवीरा मातेची जत्रा सुरू झाली की त्यापाठोपाठ बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तसेच नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामदेवतांच्या जत्रांचा थाटामाटात हंगाम सुरू होतो. आजही जुन्या चालीरीती पाळून ग्राम देवतेचा मानपान याच महीन्यात दिला जातो. नवी मुंबईत पहिली मानाची जत्रा ही जुहू‌गावातून सुरू होते. प्रत्येक गावातील जत्रा उत्सव तीन दिवसांचा असतो, पहिला दिवस जागरण, त्यानंतर मुख्य जत्रा व तिसऱ्या दिवशी शिळी जत्रा अशी काहीशी साजरी केली जाते.
गावा गावातून ढोल-ताशांच्या गजरात, देव देवांच्या तसेच सजवलेल्या जत्तर काठ्यांच्या मिरवणुक काढतात व काढत गावाच्या वेशीवर असलेल्या गावदेवीच्या देवळापर्यंत एक निशाण वाजतगाजत नेण्याची प्रथा आजही तशीच या पिढीने जपलेली पहावयास मिळत आहे.हर हर महादेव म्हणत जत्तर’काठी’ संबोधले जाते. हा एक २० ते ३० फूट लांब बांबू असतो. त्या काठीला रंगीबेरंगी कापडाची रिबीन गुंडाळून वरच्या टोकाला मोरपीस व छोटी हातघंटी घुंगरे बांधलेली फरावले लावलेले असते या काठीला वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजीत आनंदाने नाच गाण्यांचा आनंद साजरा करत मंदिर परिसर तर काही गावातून दर्शन घडवतात या प्रसंगी युवा पिढी माञ याचा आनंद लुटतात.
याच काळात राम नवमीला रायगड रोहा तालुक्यातील श्री तीर्थ क्षेत्र तळाघर येथील श्री महादेवाच्या यात्रेला देखील प्रारंभ होतो तर रामनवमी निमित्ताने यात्रेत कोळी आगरी लोक आपल्या जत्तर काठ्या घेऊन या यात्रेत येतात देवाचे लग्न विधिवत पद्धतीने विवाह सोहळा पाहण्यासाठी इतर तालुक्यांतील देखिल बहुजन समाज आतुरतेने हा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी येतात आणि या यात्रेचा लाभ घेतात तर जत्रा उत्सव म्हणुन विविध व्यवसाय करणारे दुकानदार आपली दुकाने थाटात तसेच चक्री, आगस पाळणे, मौत का कुंवा त्याच बरोबर लहान मुलांसाठी आकर्षित म्हणून विविध गेम्स आणि खेळणी तसेच हलवा मेव्याची ही दुकाने थाटण्यात येतात ,
काही ठिकाणी देवीला नैवेद्य सहाणेवर दाखवला जात असल्याने या विधीला ‘सहाण भरणे’ म्हणतात. त्यानंतर गावातील प्रत्येक घरात प्रसाद दिला जातो. गावकरी ही रात्र देवीची गाणी गाऊन व नाचून, जागून काढतात. आता तरुण पिढी जत्रेच्या एक दिवस आधी देवीच्या नावाने जागरण म्हणून देवी- देवतांची जुनी गाणी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करतात आणि उत्सव सोहळा आनंदाने साजरा करतात.
चैत्र महिन्याला प्रारंभ होताच देव देवांना प्रफुल्लित आवड निर्माण करणारी वेगवेगळ्या फुलांची देखिल बाजारात आवक होत भाविक त्याची खरेदी करतांना दिसतात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने संपन्न होत असल्याने यात राम नवमी,चैत्र पौर्णिमा,हनुमान जयंती तसेच थोर महापूर्षांची पुण्यतिथी जयंती सोहळे भक्ती भावाने साजरे करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading