चुकूनही फ्रिजमध्ये नका ठेऊ हे ७ पदार्थ

Freez

PEN न्यूज ऑनलाइन टीम : 

ज्या प्रमाणे विज्ञानाने भरारी घेतली त्या प्रमाणे मनुष्याच्या संपूर्ण चालीरीती बदलल्या. खाण्यापिण्याच्याही सवयी बदलल्या. थोड काही शिल्लक राहील की लगेचच ते नंतर वापरता येईल या हिशोबाने फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवले जातात. पण काही असे पदार्थ आहे ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकता. जसं की बरेच लोक अर्धा टोमॅटो वापरल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतात.
हेल्थ एक्सपर्ट्सनी हे खूपच धोकादायक असल्याचं सांगितलं आहे. ७ पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणं टाळायला हवं.
१) टोमॅटो
फ्रिजमध्ये चिरलेला टोमॅटो ठेवणं चुकीचं आहे कारण यात असे काही कंपोनेट्स असतात ज्यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. जर्मनीतीलल गोटिंगेन विद्यापिठातील संशोधकांच्या एका टिमच्या मते टोमॅटोमध्ये लायकोपिन असते हे एक कॅरोटीनॉईड एंटीऑक्सिडंट आहे जे टोमॅटोमध्ये असते ज्याळे लाल रंग येतो. जेव्हा टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला जातो तेव्हा फ्रिजरच्या गारव्यामुळे लायकोपीनची संरचना बदलते आणि हे ग्लायकोअल्कलॉईडमध्ये बदलते ज्याला टोमॅटाईन ग्लायकोअल्कलॉइड असं म्हणतात. टोमॅटाईन ग्लायकोअल्कलॉईड शरीरासाठी हानीकारक ठरू शकते.
२) बटाटा
फ्रिजमध्ये बटाटे कधीच ठेवू नये. तर तुम्ही अर्धवट कापलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवले तर ते पूर्ण चुकीचं आहे. थंड तापमानामुळे आ बटाटाट्यातील स्टार्च शुगरमध्ये बदलते आणि साखर शरीरासाठी चांगली नसते.
३) कांदा
अनेकजण उरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवून देतात. फ्रिजमध्ये कांदा ठेवल्यामुळे मॉईश्चर शोषून घेतो आणि ओला होतो. वास येणारा ओलसर कांदा शरीरासाठी चांगला नसतो. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे इतर पदार्थांनाही कांद्याचा वास येतो. कांद्यातील एंजाईनम्स फ्रिजच्या थंडीमुळे एक्टिव्ह होतात. ज्यामुळे कांदा लवकर खराब होतो.
४) लसूण
अनेकदा लसूण सोलून लोक फ्रिजमध्ये ठेवतात. थंड तापमानात लसूण खराब होऊ लागतात. क्वालिटी खराब होण्याबरोबर चवही बदलते. क्वालिटी खराब होण्याबरोबरच चवही बदलते. लसूण तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. कंटेनर 2 ते 3 दिवसांसाठी चांगली ठेवता येते.
५) केळी
केळी फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्याची चव आणि स्वाद दोन्ही कमी होतात. पण केळ्याला थोडं जास्तवेळासाठी ताजं ठेवण्यासाठी तुम्ही केळ्याला रूम टेंम्परेचचरवर ठेवू सकता. फ्रिजमध्ये केळी ठेवलयानंतर 3 ते 4 दिवस चांगले राहते नंतर लगेच खराब होते.
६) ब्रेड
फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यानंतर त्याची चव बदलते आणि मऊपणा निघून जातो.  फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याला बुरशी लागते आणि खराब होतो. रूम टेंम्परेचवर ब्रेड खराब होत नाही. तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये ब्रेड ठेवू शकता.
7) मध
मध फ्रिजमध्ये ठेवणं टाळायला हवं. रूम टेम्परेचरवर मध चांगले राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading