चिरनेर गावातील ऐतिहासिक शिल्पांची पडझड : दुरुस्तीची मागणी

Chiraner Satyagrah

उरण ( तृप्ती भोईर ) : 

उरण तालुक्यातील चिरनेर गावाला १९३० सालच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळे ऐतिहासिक वारसा प्राप्त केला आहे. याच गावातील हुतात्म्यांचे शिल्पे दहा दशके जुनी आहेत आणि आता त्यांच्या स्थितीत बिघाड होत आहे. या शिल्पांची दुरावस्था होत असल्यामुळे येथील नागरिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
चिरनेरच्या शिल्पांची स्थिती पाहता, सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांच्या शिल्प स्मारकांची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्ते विरोधात उरण, पनवेल तालुक्यातील जनतेने चिरनेरच्या भूमीत २५ सप्टेंबर १९३० साली शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारले. यावेळी ब्रिटिश सरकारच्या जुलमी पोलीस यंत्रणेने आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नांग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्‍वर न्हावी ( कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटा), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या आठ आंदोलनकर्त्यांना वीरमरण प्राप्त झाले. तसेच ३८ आंदोलनकर्ते या लढ्यात जखमी झाले होते.
स्वातंत्र्य संग्रामातील या गौरवशाली व पराक्रमी लढ्याचे स्मरण युवा पिढीला व्हावे यासाठी चिरनेर गावातील स्मुती स्तंभा समोर हुतात्मा स्मारकांची व हुतात्म्यांच्या पुतळ्याची ( शिल्प स्मारकांची) उभारणी करण्यात आली होती. परंतु प्रशासनाला चिरनेर, दिघोडे, धाकटी जुई,मोठी जुई, कोप्रोली,पाणदिवे,खोपटा या ७ स्मारकांकडे व हुतात्म्यांच्या पुतळ्यांकडे लक्ष केंद्रित करण्यास वेळच मिळत नाही. त्यामुळे हुतात्मा स्मारकांची अवस्था दयनीय झाली असून या शिल्पा मधील परशुराम रामा पाटील या हुतात्म्यांच्या हातातील साहित्य (कोयता) निखळून पडला आहे. तसेच इतर हुतात्म्यांच्या हातातील ध्वजाची, अंगावरील कपड्यांची पडझड सुरू झाली आहे. तरी हुतात्म्यांच्या स्मारकांना, हुतात्म्यांच्या पुतळ्याना नवा लूक प्राप्त करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी इतिहास प्रसिद्ध गावात ये-जा करणारे पर्यटक नागरीक करत आहेत.
२५ सप्टेंबर २०२४ रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४ वा हुतात्मा स्मुतीदिन कार्यक्रम यावर्षी शासकीय मानवंदना देऊन रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती उरण, चिरनेर ग्रामपंचायत व नवीमुंबई पोलीस यंत्रणा साजरा करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading