
विद्यमान आमदारांच्या विकासाच्या अपयशामुळे यादव यांची चर्चा
संगमेश्वर :
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय उलथापालथीचे चित्र आहे. विद्यमान आमदार शेखर निकम यांनी शरद पवार यांचा विश्वासघात करत अजित पवार गटाशी जवळीक साधल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विकासाच्या नावावर अजित पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे मतदारसंघात नाराजी पसरली आहे. विद्यमान आमदारांच्या कार्यकाळात कोणतेही ठोस विकासकाम झालेले नाहीत. नुकत्याच झालेल्या आमसभांमध्येही एकाही समस्येचे निराकरण झालेले नाही.
अजित पवार गटाच्या ‘जन सन्मान यात्रा’नंतर, शरद पवार यांची वादळी सभा चिपळूणमध्ये झाली, ज्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात निवडणुकीत संघर्ष होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या, वासिस्ट मिल्क चे प्रमुख प्रशांत यादव यांचे पारडे जड मानले जात आहे. शरद पवारांनी विधानसभेसाठी यादव यांना पुढे आणल्यामुळे, त्यांच्या नावाची चर्चा चहूबाजूंनी सुरू आहे.
विद्यमान आमदार विकासकामांमध्ये अपयशी ठरले आहेत, विशेषत: तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. प्रशांत यादव यांनी घराघरात पोहोचून तुतारीचे बळ वाढवले आहे. शिंदे गट, शिवसेना, भाजप, मनसे आणि काँग्रेससारखे पक्ष मात्र म्हणावा तितके सक्रिय नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 2019 प्रमाणे युतीला मदत करावी की धर्म पाळावा, यावर विद्यमान आमदार आणि यादव यांचे भवितव्य अवलंबून आहे.