विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदार संघातील शेकापचे अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील व उरण विधानसभा मतदार संघातील उमेदवार प्रितम म्हात्रे गुरुवारी ( दि. 24 ) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा प्रमुख, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, जनतेच्या हितासाठी त्या धावून गेल्या. रुग्णांना वेळीच उपचार मिळावा यासाठी प्रशासनाकडे सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीचा हात देण्याचे काम त्यांनी केले. तसेच ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची वाट सुखकर व्हावी यासाठी त्यांनी 25 हजारहून अधिक मुलींना मोफत सायकली दिल्या.
शासनाच्या एक पाऊल पुढे जात अनेकांना ताईची सावली या घरकूल योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर बांधण्याबरोबरच दुरुस्तीसाठी आर्थिक मदत केली. रायगड जिल्ह्यात टेनिस क्रिकेट स्पर्धेचा क्रेझ वाढला आहे. तरुणांना क्रिकेटमधून हक्काचे व्यासपिठ मिळावे. यासाठी आयपीएलच्या धर्तीवर पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा भरवून स्थानिक खेळाडूंना खेळाची संधी उपलब्ध करून दिली. वैद्यकिय सेवासह अडचणीच्या वेळेला त्या कायमच प्रत्येकाच्या मदतीला धावून गेल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी सभेमध्ये चित्रलेखा पाटील यांची उमेदवारी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विशेष म्हणजे महिला वर्गांनी हा आनंद नृत्यांनी साजरा केला. चित्रलेखा पाटील यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून चित्रलेखा पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे राजकीय, सामाजिक, आदी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक म्हणून काम करीत असताना जनतेचे प्रश्नांची सोडवणूक करण्याचा त्यांनी सातत्यांनी प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांची देखील उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.