चायनीजसह खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांवर बेकायदा मद्य विक्री सुरु !

Chainees Centre

पनवेल :

पनवेल परिसरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी शहरातील रस्त्यालगत, चौकांमध्ये आणि इतर मोक्याच्या ठिकाणच्या जागा चायनीजसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बळकावल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्र होताच रस्त्यावर फास्टफूड विक्रेते, चायनीज सेंटर यांच्या गाड्या लागत आहेत. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या हातगाड्यांवर होणाऱ्या गर्दीत रस्तादेखील अडवला जात आहे. तसेच या ठिकाणी मद्य विक्री सुद्धा करण्यात येत असल्याने अशा फेरीवाल्यांवर पोलिसांसह महापालिकेच्या पथकानेही कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा शिरकाव झाला आहे. शहरातील, शहराबाहेरील व्यक्तींकडून दिवसा, रात्री हातगाड्या मांडून, पदपथावर ठाम मांडून व्यापार केला जात आहे. त्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचीही मोठी भर पडली आहे. रस्त्यांवरच सिलिंडर मांडून खाद्यपदार्थ शिजवून विकले जात आहेत. त्यामध्ये फास्टफूड, चायनीज, तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे. यामुळे सिलिंडरच्या स्फोटाच्या, आगीच्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय उघड्यावर शिजवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे, त्याच प्रमाणे अनेक ठिकाणी बेकायदा मद्य विक्रीसुद्धा सर्रास सुरु आहे.

काही गाळ्यांमध्ये सुद्धा चायनीज सेंटर मध्ये विनापरवाना मद्य विक्री होत असल्याने या चायनीज गळ्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मध्यंतरी उघड्यावर, रस्त्यांवर सिलिंडर वापरून व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांकडून अधून-मधून कारवाई केली जात होती. मात्र, त्यातही एकीकडे कारवाई केली जाते, तर दुसरीकडे कानाडोळा केला जातो. यामुळे काही ठिकाणे रात्रीच्या वेळी व्यावसायिकांच्या सोयीची ठरत आहेत, अशा सर्वच ठिकाणी कारवाईची विशेष मोहीम राबवली जाण्याची गरज आहे. अनके वेळा अशा ठिकाणी रात्री-अपरात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यादेखील जमत आहेत. त्यांच्यात हाणामारीच्या घटना देखील यापूर्वी घडलेल्या आहेत. तरी अश्या चायनीज सेंटर व खाद्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading