घशात खवखव होते, जरूर ‘हे’ उपाय करा, मिळेल आराम

Ghasa
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
 ऋतु बदलत असताना हवामानात होणार्‍या बदलामुळे अनेक समस्या निर्माण होतात त्यातील एक बदल म्हणजे होणारी सर्दी. यामुळे डोकं जड होण, घसा खवखवणे या समस्या प्रामुख्याने उद्भवतात. यावर काही घरगुती उपाय  जाणून घेऊया…
तुळशीचा चहा
तुळशीच्या पानांपासून बनवलेल्या चहामुळे घसादुखी कमी होते.
हळदीचे दूध
हळदीचे दूध घशाची जळजळ आणि वेदना शांत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
गुळणी करणे
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळणी करा. यामुळे घशातील सूज, वेदना कमी होते. दिवसातून २ वेळा गुळणी करा.
त्रिफळा चूर्ण
त्रिफळा चूर्ण घशातील सूज आणि वेदना कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ते घ्या. (Sore Throat)
मध आणि आले
मध आणि आल्याचा रस मिसळून चाटण तयार करून त्या सेवन करा. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो.
बदाम तेल
बदाम तेल हलके गरम करून हलक्या हातांनी घशावर मसाज केल्याने घशाची खवखव कमी होते.
ज्येष्ठमध 
ज्येष्ठमध पावडर कोमट पाण्यात मिसळून गुळणी केल्याने घशाला आराम मिळतो.  
(टीप: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. आम्ही याची पुष्टी करत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading