घराचा पाया बाप आणि कलश आई आहे, देशाच्या रक्षणासाठी भगतसिंग आणि धर्मासाठी संभाजी राजे झिजले : हभप बाळशिराम मिंडे

Akhand Harinam Saptah Varasgav
कोलाड (श्याम लोखंडे) :
ज्ञान म्हणजे संत ज्ञानोबाराय, वैराग्य म्हणजे संत तुकाराम महाराज, शांती म्हणजे शांतीब्रह एकनाथ महाराज भक्ती म्हटले की संत नामदेव महाराज आणि निष्ठा म्हटले की, संत निळोबाराय वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानोबाराय आहेत त्याचा कलश वैराग्य मूर्ती संत तुकाराम महाराज. आपण ज्या देशात जन्माला आलो ती देशनिष्ठा देशासाठी क्रांतिकारक चळवळ स्वीकारून भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांनी देश स्वातंत्र्येकाळात देशासाठी भारत माते की जय म्हणत आपल्या प्राणाची आहुती दिली, तर धर्माच्या रक्षणासाठी संभाजी राजांनी बलिदान दिले .परंतु आपला धर्म सोडला नाही. औरंगजेबानी त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी संभाजी राज्याला अनेक जाच केले जहागिरी कबूल केली तरी देखील संभाजी राजे झुकले नाहीत. जाचात डोळ्यात सळसळत्या सळ्या घातल्या अंगाचे तुकडे तुकडे केले तरी देखील धर्माचे रक्षण करण्यासाठी संभाजी राजांनी आपला धर्म सोडला नाही ती खरी धर्म निष्ठा आहे दाखवून दिले.
देशभक्त भगतसिंगला मुलीकडील पाहुणे लग्नासाठी पहायला येणार म्हणून त्यांना त्यांच्या आईने वीस रुपये देऊन किराणा आणण्यास दुकानावर धाडले मात्र त्याच भगतसिंगाने मनात विचार केला की मी लग्न करून घरात बसणार मग देशासाठी काय करावे याचा विचार केला आणि थेट दुकानावर किराणा आणण्यास गेलेले भगतसिंग यांनी थेट देश रक्षणासाठी क्रांतिकारक चळवळ स्वीकारून त्यात सामील झाले. त्यामुळे देशासाठी जागा.धर्माचे रक्षण करा बाप कुटुंबातील घरचा पाया आहे आणि आई कलश आहे.असे मत शिरूर येथील हभप बाळशिराम महाराज मिंडे यांनी वरसगाव येथील कीर्तनरूपी सेवेत व्यक्त केले.
रोहा तालुक्यातील मौजे श्री तीर्थक्षेत्र सापया वरसगाव येथे श्री आदिनाथ संप्रदाय सेवा मंडळ व ग्रामस्थ वरसगाव यांच्या वतीने ३२ वे अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत संपन्न होत असलेल्या सहाव्या दिवसाच्या हरिकीर्तनरूपी सेवेतून मार्गदर्शनपर मिंडे महाराज बोलत होते. यावेळी कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंग मनी,टाळकरी, वारकरी संप्रदायाची श्रोते मंडळी आदी ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात आध्यात्मिक तथा धार्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या वरसगाव येथे गेली बत्तीस वर्ष अविरतपणे चालत असलेला हा अखंड हरिनामसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे तर प्रसंगी कीर्तन रुपी सेवत निवडलेल्या म्हैसीपुत्रामुखें बोलवणें श्रुती । चालवणें बैसोनियां॥अभ्यास हा सामान्य महिमा संतांचा । नैवेदय शहराचा जेवी ॥२॥ उदकामाजी वह्या ठेऊनी कोरडया ।पाहणें रोकड्या विश्वजनां ॥३॥ निळा म्हणे तिहीं संगेंचीं तारणें । दीने उधरणें नवल कोण ॥४॥ या अभंगातून विवेचन करतांना उपस्थित संप्रदाय मंडळी समावेत पुढे गुरूची निष्ठा सांगत म्हणाले की छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ज्यांच्यामुळे देवळातील देव मंदिरावरील कलश आणि दारात हिरवी गार तुळस जी आहे ना ते म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजे यांच्या मुलेच.त्यामुळे देशासाठी काही करता नाही आले तर धर्मासाठी करा आणि जागा तसेच ज्ञान,वैराग्य,शांती,भक्ती आणि गुरूंवरील निष्ठा काय असते ते या अभंगातून पटवून दिले.
बाप कायम मलकट कपड्यात राहिला काटकसर करून धोतराला गाठ मारून प्रपंच केला घराचा पाया बाप आहे आणि कलश आई आहे जन्म दात्या आई वडिलांना विसरू नका ऐक वेळ बाप स्वतःसाठी काही करायचं ठेऊन तुमच्यासाठी झिजतो तुम्हाला जे हवे ते आणून देतो स्वतः काही खात नाही मात्र तुम्हाला आणून देत तुमची काळजी घेतो त्याच बरोबर आई देखील तुम्हाला जीवाची पराकाष्ठा करुन लहानाचे मोठे करते तुम्हाला अथांग सागरासारखा प्रेम देते त्यामुळे ती कलश आहे हे विसरू नका तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे ही असा मात्र त्यांची आजारपणात सेवा करायला विसरू नका असे शेवटी सांगितले.
गेली सहा दिवस अखंडपणे चालत असलेला हा अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे तर हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री आदिनाथ सेवा मंडळ तसेच वरसगाव ग्रामस्थ महिला मंडळ आणि युवक मंडळ अथक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading