घरफोडी करणारे सराईत चोरटे जेरबंद, १८ गुन्हे उघड, २० लाखाचा मुद्देमाल हस्तगत

muddemal
पनवेल ( संजय कदम ) : पनवेल, नवी मुंबई व मुंबई परिसरात घरफोडी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार मानपाडा पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल २० लाख रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
मानपाडा पोलीस ठाणे हददीत घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने मानपाडा पोलीस स्टेशनचे पोनि सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस पथकाने त्यानुषंगाने तपास करत असताना आरोपी येण्या जाण्याचे मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करून तसेच गोपनिय बातमीदाराच्या आधारे अहोरात्र मेहनत घेवून सराईत गुन्हेगार युसुफ रशिद शेख (वय ३८, रा. घणसोली) आणि नौशाद मुस्ताक आलम उर्फ सागर (वय २८, रा.कामोठे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यासह पनवेल, नवी मुंबई व मुंबई परिसरात केलेल्या १८ घरफोडीचे गुन्ह्यांची कबुली दिली.
मानपाडा पोलिसांनी त्यांच्या कडून २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २ लाख २० हजार ५०० रूपये रोख रक्कम, २ मोटारसायकल, २ लॅपटॉप, ८ मोबाईल, ५ मनगटी घडयाळ, १ कॅमेरा, १ स्पिकर, १ एटीएम कार्ड, १ नंबर प्लेट, १ हेल्मेट, घडफोडी करण्याकरीता वापरलेले २ लोखंडी कटावणी, स्कु ड्रायव्हर, पकड, व चाकू असा एकुण २० लाख १५ हजाराचा मुददेमाल हस्तगत केला आहे.
सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी त्यांच्यावर पनवेल, कामोठे, तळोजा यांच्यासह नवी मुंबई व मुंबई मधील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading