मुंबई :
फिरायच म्हटलंकी सुट्टीमधील अनेकांच्या पसंतीच ठिकाण येत ते म्हणजे गोवा आणि या गोव्याला जाण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसची जर सुविधा असेल तर नक्कीच आनंद द्वीगुणीत झाल्या शिवाय राहणार नाही.
किमान वेळात गोव्यात पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाडीमुळं मोठं अंतर कमीत कमी वेळात ओलांडणं अगदी सहज शक्य झालं आहे. आरामदायी प्रवास आणि कोकणातून पुढे जाणारी वाट पाहता हा प्रवास नेमका कधी पूर्ण होतो हेच लक्षात येत नाही.
एक्स्प्रेसबबातची माहिती
आठवड्यातून 6 दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशा दिवशी प्रवाशांच्या सेवेत असते. दादर, ठाणे, पनवेल ,खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिवीम अशा स्थानकांवर ही रेल्वे थांबते. ही सेमी हायस्पीड रेल्वे तुम्हाला अपेक्षित स्थानकावर साधारण 7 तास 45 मिनिटांत पोहोचवते.
(22229) ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून पहाटे 5 वाजून 25 मिनिचांनी प्रवास सुरु करून दादरला ही ट्रेन सकाळी 5 वाजून 32 मिनिटांनी पोहोचते. पुढे ठाण्यापपर्यंत ही ट्रेन सकाळी 5 वाजून 52 मिनिटांनी आणि पनवेल येथे सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी पोहोचते. खेडला ही वंदे भारत 8 वाजून 24 मिनिटांनी पोहोचते तर, रत्नागिरीत ती पोहोचण्यासाठी सकाळते 9 वाजून 45 मिनिटं होतात. पुढे कणकवली येथे ट्रेन 11 वाजून 10 मिनिटं आणि थिवीमला 12 वाजून 16 मिनिटांनी पोहोचते. मडगाव येथे ही ट्रेन दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पोहोचते. या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झेक्युटीव्ह चेअर कार असे 9 डबे आहेत.
तिकीट दर
ट्रेन |
चेअर कार |
एक्झेक्युटीव्ह चेअर |
दादर- मडगाव |
1595 रुपये |
3115 रुपये |
ठाणे- मडगाव |
1570 रुपये |
3045 रुपये |
कल्याण- मडगाव |
1595 रुपये |
3115 रुपये |
खेड – मडगाव |
1185 रुपये |
2265 रुपये |
रत्नागिरी- मडगाव |
995 रुपये |
1790 रुपये |
थिवीम- मडगाव |
435 रुपये |
820 रुपये |
मुंबई- मडगाव |
1595 रुपये |
3115 रुपये |