गोमांस तस्करी करणार्या तीन आरोपींसह मुद्देमाल जप्त करण्यात पेण पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.
मिळालेल्या महितीनुसार, गोमांसने भरलेला टेम्पो खोपोलीकडून पेणकडे येत असल्याची पक्की खबर वायरलेसद्वारे पेण पोलिसांना प्राप्त होताच सापळा रचून मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेऊन, या बाबतचा गुन्हा दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पेण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. सदरील ही कारवाई पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.
सदर प्रकरणात टेम्पो क्रमांक एमएच ०५/एफजे १५११ मध्ये ६,९८,००० रुपये किंमतीचे ३४९० किलोग्रॅम गोवंशीय मांस सापडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे मांस नष्ट करण्यात आले असून ३ लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान टेम्पो मालक साजीद लायक कुरेशी, रा. रसुल बिल्डींग, कुरेशीनगर, कुर्ला पूर्व, मुंबई असल्याचे समोर आले. या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटवून १९ डिसेंबर २०२४ रोजी तीन आरोपींना अटक करण्यात आली: