कोलाड ( श्याम लोखंडे ) :
आदि माया शक्ती कलगी तरुण मंडळ रोहा, माणगाव, सुधागड यांचे गुरुवर्य कै.पट्टे तुकाराम वस्ताद यांची ३३ वी पुण्यस्थिती सोहळा वरसगाव येथे मोठया आमृसकर परिवाराकडून उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी रायगडची शान बुलंद आवजांचे बादशाह शक्तीवाले शाहीर संतोष कांबळे तसेच तुरेवाले शाहीर वसंत भोईर यांच्या सुरमय शाहिरीतून तसेच शेअर टोमणा गाण्यांनी रसिकांची मने जिंकली.
यावेळी उस्पुर्त प्रतिसाद लाभलेल्या या नाचाच्या जंगी सामन्यांचे शुभारंभ सुशील शिंदे,राहुल शिंदे, विजय सानप, आशिष गांधी, तुकाराम सानप, अशोक लहाने, रविंद्र मामळुस्कर, विठोबा खांडेकर,मोहन सानप,किसन ढोकरे, उमाजी जाधव, अनिल सानप,व असंख्य नागरिक यांच्या शुभेहस्ते करण्यात आले.
यावेळी शक्तीवाले शाहीर संतोष कांबळे नाच मंडळ शिस्ते, श्रीवर्धन तसेच तुरेवाले शाहीर वसंत भोईर नाच मंडळ तिसे रोहा, याला रसिकप्रेशकानी भरभरुन प्रतिसाद दिला तर या दोघांनी तोडीस तोड गण गौळण तसेच रामायण, महाभारत यांच्या शास्त्रावर आधारित पदे तसेच शेअर शाहिरितून टोमणा बाजी सादर करून रशिकांची मने जिंकली.
तसेच शक्ती वाले शाहीर संतोष कांबळे यांनी कै.गुरुवर्य तुकाराम वस्ताद यांच्या पुण्यस्थिती निमित्ताने पट्टे तुकाराम गुरुवर्य पुण्यस्मरण करा, ३३ व्या पुण्यस्थिती सोहळा वाटतोय बरा,त्यांना मानाचा मुजरा हे गित सादर केले तर शाहीर वसंत भोईर यांनी ही मानाचा मुजरा केला. यावेळी शाहीर शंकर जाधव, योगेश जाधव, अनंत मगर, नरेश महाबळे व असंख्य शाहीर तसेच महेश ठाकूर, चंद्रकांत लोखंडे, दगडू शिगवण असंख्य नागरिक उपस्थित होते.
सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी अनंत आंब्रुस्कर, सुरेश आंब्रुस्कर, अजित आंब्रुस्कर, अमर आंब्रुस्कर, मंदार आंब्रुस्कर, ग्रामस्थ मंडळ वरसगांव, पद्मावती नगर, सापया क्रीडा मंडळ व महिला मंडळ वरसगांव यांनी मेहनत घेतली.