गिग वर्कर्सवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध ब्लिंक इट व्यवस्थापना विरोधात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह कॉलनी फोरमची धडक

Panvel Shivasena
पनवेल :
ब्लँकेट मध्ये डिलिव्हरी साठी काम करणार्‍या गिग रायडर्स वर होणार्‍या अन्याय विरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महानगर संघटीका व कॉलनी फोरम अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांच्या नेतृत्वाखाली ब्लिंकेट व्यवस्थापनावर धडक दिली.
आपल्या कामाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे ब्लिंक इट कंपनीच्या डिलिव्हरी बॉईज वर अन्याय होत आहे. या अन्याय विरोधात या सर्व गीग रायडर्सने कॉलनी फोरम अध्यक्षा सौ.लीना अर्जुन गरड यांची भेट घेऊन या संदर्भात मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कॉलनी फोरमने गिगराईडर्स ची समस्या समजून घेऊन तातडीने कामोठे येथील ब्लिंक इट स्टोअरवर धडक देत ब्लिंक इट व्यवस्थापनाला धारेवर धरले. सर्व रायडर्सना डिलिव्हरी साठी योग्य मोबदला मिळाला पाहिजे तसेच रायडर्स ला कामाचे तास ठरवून देण्यात यावे आणि त्यानुसार त्यांना प्रत्येक तासाला किमान शंभर रुपये मोबदला देण्यात यावा अशा मागण्या यावेळी गिग रायडर्सच्या वतीने करण्यात आल्या.
मुजोर व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे सर्व कामगारांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेत बेमुदत संप पुकारला आहे. ब्लिंकेट व्यवस्थापनाने पुढील सात दिवसात सर्व गीग रायडर्सच्या मानधनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा गिग रायडर्स आणि कॉलनी फोरम यांच्या वतीने ब्लिंक इट विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
यावेळी कॉलनी फोरम अध्यक्षा तथा शिवसेना महानगर संघटिका लीना अर्जुन गरड,  मुख्य समन्वयक मधु पाटील, कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश आढाव, सचिव बापू साळुंखे, शहर संघटक अनिल पवार ,समन्वयक महेंद्र पवार तसेच  गीग रायडर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading