गावदेवी धानकान्हे माती बंदरावर रंगला जिल्हास्तरीय बैल गाडी शर्यतीचा थरार, संतोष गायकर यांच्या गाडीने जिंकली शर्यत

Roha Dhankanhe Bailgadi Sharyat
कोलाड (श्याम लोखंडे) :
हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे रोहा यांच्या वतीने भव्य जिल्हा स्तरीय धानकान्हे माती बंदर येथे रविवारी 19 जानेवारी रोजी रायगड जिल्हा स्तरीय बैलगाडी ( छकडा ) जंगी शर्यतींचे आयोजन केले होते. या स्पर्ध्येत रोहा तालुक्यातील उडदवने येथील गाडी मालक संतोष गायकर यांच्या बैलगाडी अंतिम फेरीत प्रथम तर सेमी फायन मध्ये साहिल जोशी महादेवखार यांची बैल गाडी प्रथम आली असून स्पर्धेत विजयी होणाऱ्या गाडी मालकाला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा हौशी बैल गाडी शर्यत , गावदेवी क्रिडा मंडळ व ग्रामस्थ धानकान्हे यांच्या वतीने प्रमूख उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते रोख पारितोषिक व ढाल देऊन सन्मान करण्यात आले.
रायगड जिल्हा स्तरीय रोहा तालुक्यात मौजे गावदेवी धानकान्हे माती बंदरावर रंगलेल्या बैल गाड्यांच्या शर्यतीचा धुरळा डोळ्यांचे पारणे फेडणारा पुन्हा हौशी रसिक प्रेक्षकांना पहावयास मिळाला तर उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या रोहा तालुक्यातील हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे येथील स्पर्धेत जवळपास एकशे वीस बैल गाड्या सहभागी झाल्या होत्या.गावदेवी हौशी बैलगाडी मालक धानकान्हे यांच्या विद्यमनाने या जंगी बैलगाडी शर्यती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर सदरच्या आयोजित केलेल्या या बैलगाडी शर्यतीत एकूण अकरा गट सोडण्यात आले. तर फायनल गटातून प्रथम संतोष गायकर उडदवणे रोहा यांच्या बैल गाड्यांनी सरसी मारली तर द्वितीय अहमद पठाण खडतर श्रीगाव, तृतीय रक्षिकर बंधू नवखार वासुदेव घोगल, तर सेमिफायनल मध्ये प्रथम साहिल जोशी, द्वितीय योगेश देशमुख, तृतीय दिनेश रटाटे यांच्या बैलगाडीने ही शर्यत जिंकत मालकांनी गुलालाची उधळण केली.
गावदेवी धानकान्हे माती बंदरावर रंगलेल्या बैल गाड्यांचा थरार पाहण्यासाठी हजोरोंच्या संख्येने हौशी रसिकांनी एकच गर्दी केली होती.तर स्पर्ध्येत सहभागी झालेल्या शंभरहून अधिक बैल गाड्यांच्या माध्यमातुन एकुण अकारा गटातून सोडण्यात आलेल्या बैलगाडी शर्यत मध्ये कॉटर फायनल मध्ये अनिल पाटील प्रथम, अलंकार लहाने द्वितीय, अनिकेत पाटील तृतीय,तर गट क्रमांक एक हौशी गटातूनआदेश गायकवाड प्रथम, नामदेव देवकर द्वितीय, आदित्य गायकवाड तृतीय,गट क्रमांक दोन मधून राम शेडगे प्रथम, संजू मोरे द्वितीय , फातिमा दाऊद तृतीय,गट क्रमांक तीन मधून काशिनाथ म्हात्रे प्रथम , मंगेश डाके द्वितीय, गोरख नाईक तृतीय,यांच्या बैलगाड्यानी शर्यत जिंकली त्याच बरोबर अतिशय रंगदार आणि मजेदार शर्यतीचा आनंद रसिक प्रेक्षकांना मिळाला तो म्हणजे गट क्रमांक चार ते आठ यामध्ये गट क्रमांक चार मध्ये राहुल नाईक, सुनिल कासार , पाच मधून नामदेव जाधव, सापाया वरसगाव, महेंद्र थिटे, सहा मधुन सर्वेश खेरटकर, जय मल्हार, कैलास बापरे,सात मधून लहाने, सुहास कडव, युवराज नाचरे,आठ मधून रविंद्र म्हात्रे, विनायक भावे,आणि अजित वरणकर, यांच्या बैल गाडी जोडीने रंगत दाखवत बाजी मारली.
तसेच या शर्यतीत बैल गाड्यांचे एकूण आठ गट अधिक कॉटर फायनल सेमी फायनल आणि फायनल चे गट असे एकुण अकरा गट तयार करण्यात आले होते तर शर्यतीत सर्वांच्या नजरा लागलेल्या अंतिम फेरीत भुर्रर्र गाडीचा धुरळा उडवत व रंगतदार थरार संतोष गायकर उडदवने रोहा यांनी थरार दाखवत फायनलची शर्यत जिंकली, अहमद पठाण व्दितीय, राकसिकर बंधू,यांच्या बैलगाडी जोडीने अंतिम फेरीतील तिसरा क्रमांक पार करत हे विजेतेपद पटकावले.
माती बंदरावर थरारक रंगलेल्या या बैलगाडी शर्यतीचे शुभारंभ व बक्षीस वितरण देवकान्हे ग्राम पंचायतीचे उपसरपंच तथा युवकांचे प्रेरणास्थान सूरज कचरे,डॉ श्यामभाऊ लोखंडे,डॉ. बालाजी वाखरकर, नंदकुमार मरवडे , कमलेश शिंदे, गावचे पोलिस पाटील पांडूरंग कचरे, नामदेव देवकर, विश्र्वास राऊत आदी हौशी बैल गाडी स्पर्धक ग्रामस्थ तसेच हजारोंच्या संख्येने हौशी रसिक प्रेक्षक उपस्थीत होते.
तर गावदेवी धानकान्हे माती बंदरावर रंगतदार बैल गाड्या शर्यतींचा थरारचे उत्तम समालोचन नंदकुमार मरवडे यांनी केले तसेच उपस्थीत मान्यवरांचे स्वागत आयोजक हौशी बैल गाडी मालक धानकान्हे यांनी केले तर शर्यत यशस्वी करण्यासाठी अशोक देवकर,अनिल जाधव,आदेश,कमलेश,आदित्य, प्रशांत गायकवाड बंधू व संजय आबेंतकर आदी हैशी बैल गाडी मालक ग्रामस्थ धानकान्हे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading