नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत पनवेल तालुका पोलिसांनी सीईआयआर पोर्टलचा वापर करून गहाळ झालेले 48 मोबाईल मुळ मालकांस परत केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक अनुरूध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा महेश धुमाळ, सुनिल कुदळे, भिमराव खताळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सीईआयआर पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीतील सन 2025 माहे मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 48 मोबाईलचा सीईआयआर पोर्टलव्दारे शोध घेवून विविध राज्यातुन एकुण 48 मोबाईल ज्याची अंदाजे 5,76,000/-रुपये किंमतीचे हस्तगत करण्यात आले आहे.
सदरचे हस्तगत केलेले मोबाईल फोन हे तक्रारदार यांना पोलीस ठाणेस बोलावुन त्यांचे मोबाईल फोन त्याच्या ताब्यात दिले आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.