प्रेमी युगामध्ये तीन महिन्यापूर्वी काही कारणास्तव झालेल्या ब्रेकअप मुळे संतप्त झालेला प्रियकर निकेश सुधाकर शिंदे (राहणार दिवेगाव, ठाणे, वय २५)याने बावीस वर्षीय प्रेयसी जागृती हरेश सत्वे हिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून स्वतःच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ही रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथील सेक्टर अठरा येथे घडली आहे. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी आणि आरोपी निकेश शिंदे यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. ३ महिन्यांपूर्वी त्यांचा काही कारणास्तव ब्रेकअप झाला होता. ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय प्रियकराला होता. प्रियकराच्या मनामध्ये संशयाने घर तयार केले होते. या संशयाचा राग मनात ठेवून प्रियकर आरोपी निकेश सुधाकर शिंदे हा ३१ जानेवारीला प्रेयसी जागृती सत्वे हिच्या घरी गेला आणि दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस असे बोलून तिच्याशी वादविवाद करून शिवीगाळ आणि हाताने मारहाण केली. यावेळी तिच्या घरी आई आणि तिची बहीण देखील होती.
प्रेम प्रकरणातून तरूणीच्या घरात घुसून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. प्रियकर आरोपीने तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे. या घटनेत २२ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियकर निकेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे.
संध्याकाळी पावणे सहा ते साडेसहाच्या दरम्यान आरोपीने जागृती सत्वे हिच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर देखील वार केले. या हल्ल्यात जागृती सत्वे हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या आरोपीवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खान्देश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.