गणपतीला प्रसादाच्या साहित्य ऐवजी शैक्षणिक साहित्य आणण्याचे मनसेचे नाविन्यपूर्ण संकल्पना योजनेतून भक्तांना आव्हान

Vaibhav Khedekar

महाड ( मिलिंद माने ) : 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज वैभव प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून खेडचा राजा सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे वतीने गणेश भक्तांसाठी आवाहन करण्यात येते की गणपती चरणी फुल दुर्वा पेढे प्रसाद न वाहता शैक्षणिक साहित्याचे अर्पण करावे असे आवाहन. मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे.
खेड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वैभव प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या खेडच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चालू वर्षीपासून नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार त्यांनी गणेशोत्सवास दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना हार , फुले नारळ पेढे यासारखा प्रसादाचे साहित्य न आणता गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य बाप्पाच्या चरणी वाहून एक वेगळा संकल्प राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घेतला आहे या निर्णयाला खेड तालुक्यासह दापोली मंडणगड व चिपळूण या तालुक्यातून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे या नाविन्यपूर्ण योजनेबद्दल वैभव खेडेकर यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल सर्वत्र वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे.
खेड शहरात राबविण्यात आलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रसादा ऐवजी शैक्षणिक साहित्याच्या उपक्रमाचे स्वागत सर्वत्र होत असताना मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह लायन्स क्लब खेड, प्रेस क्लब खेड. यांचे देखील सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. मनुष्याचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी राबवलेल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणावर राज्यातील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन असाच उपक्रम राबवून गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल असा उपक्रम राबवण्याचे आव्हान मनुष्याचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सर्व गणेश भक्ता मंडळाचे अध्यक्षांना केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading