गजानन नथू पाटील यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचा विशेष सन्मान

Gajaanan Patil
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 
कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सोमवार, दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने एक भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अलिबाग तालुक्यातील नवगाव गावचे रहिवासी आणि आरसीएफ (थळ) चे माजी कर्मचारी गजानन नथू पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजसेवेसाठी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गजानन पाटील हे मानवता सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून समाजाच्या दुर्बल घटकांसाठी काम करत आहेत. दिव्यांग, अनाथ, आदिवासी आणि पिवळी शिधापत्रिका असलेल्या गरीब कुटुंबांसाठी ते शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करत आहेत. विशेषतः गरजू बंधू-भगिनींना शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, साडी फॉल बिडिंग मशीन यांसारख्या आर्थिक उपजीविकेच्या साधनांचे वितरण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
याशिवाय, पाटील यांनी शेतकरी वर्गाच्या विकासासाठीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. खत नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि SRT (सगुणा राइस टेक्नोलॉजी) यासारख्या तंत्रज्ञानाची जनजागृती करून त्यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. यामध्ये फवारणी यंत्र, ताडपत्री, गोबर गॅस, सोलर पंप, विहीर बांधणे यासारख्या योजनांचा समावेश आहे.
पाटील यांनी आदिवासी समाजासाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून त्यांच्यात सामाजिक एकात्मतेची भावना रुजवण्याचे कार्य केले आहे. तसेच, गरजू मुलांना वह्या, खाऊ वाटप आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी समाजसेवेत आपली अमूल्य कामगिरी बजावली आहे.
या सन्मान सोहळ्यात पाटील यांचे योगदान समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे नवगाव गावातील आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अभिमानाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील आणि अनेक मान्यवरांनी पाटील यांचे याबद्दल कौतुक केले असून त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading