
माथेरान (मुकुंद रांजणे ) :
फक्त क्रिकेट एके क्रिकेटचा खेळ आणि दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून आपला ठसा उमटवणे आणि क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट या खेळात नेहमीच उत्तम कामगिरी पार पाडत असताना क्रिकेटच्या बाहेरील दुनियेत ज्या काही लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत, सामाजिक उपक्रम आहेत, गरजवंताला कोणत्या गोष्टी अभिप्रेत असतात त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी येथील बंड्या बॉईज संघ नेहमीच तत्पर असतो.
बंड्या_बॉईज संघ हा केवळ क्रिकेट क्षेत्रा पुरता मर्यादित नसून माथेरानच्या सामाजिक,राजकीय, शैक्षणिक व अन्य उपक्रमात नेहमीच सक्रिय सहभाग दर्शवत असतो. बंड्या बॉईज या संघाला एक संस्थेच्या रुपात जरी पाहिले असता यात काही वावगे ठरणार नाही.
संघर्षाचा काळ लक्षात घेतला असता डोळ्यासमोर उभे राहते ते “कोरोना लॉकडाउन” या दिवसांमध्ये भयंकर महामारी चा त्रास सहन करत असताना सर्वत्र हाहाकार माजला होता. माथेरानकर सुद्धा अनेक समस्यांशी झुंजत होते. या दिवसांमध्ये बऱ्याच संस्था माथेरानला अन्नधान्य किट, घोड्यांसाठी भुसा अशा स्वरूपात मदत करत होते.
बाहेरून जरी मदत आली असली तरी युद्धपातळीवर कामे करून सर्व सामान्यांपर्यंत ते अन्नधान्याचे किट, घोड्यांकरिता आलेला भुसा पोहचवणे फार कठीण व संघर्षमय काम होते. कारण तो कोरोनाचा प्रादुर्भाव हवेमार्फत व संचार केल्यामुळेच जास्त वाढत होता.. परंतु या दिवसांमध्येही स्वतःचा विचार न करता बंड्या बॉईज संघातील खेळाडूंनी अन्नधान्याचे पॅकेट एकत्र भरुन ते किट व घोड्यांसाठी लागणारा भुसा घरोघरी पोहोच केला होता. सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारी ही मुले स्वच्छता मोहीम,वृक्षारोपण,रक्तदान शिबीर सामूहिकरित्या श्रमदान अशा बऱ्याच समाजोपयोगी कामांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.
क्रिकेट क्षेत्रात सुध्दा उत्तुंग भरारी घेत असताना या खेळाडूंनी सामाजिक सलोखा जपला आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये बंड्या बॉईज संघाचे सर्वेसर्वा कुलदीप जाधव,योगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर रांजाणे, ओमकार रांजाणे, आदित्य भिल्लारे, अरुण शेट्ये,तेजस कदम, संजय कदम, विशाल बिरामणे,यश शिंदे,कुमार शेट्ये, विजय कदम,अंकित पार्टे, प्रमोद कदम, तनुज शिंदे, सौरव कदम, रोहित बिरामणे, किरण पार्टे, निमेश दळवी, चैतन्य शिंदे, रोहित शिंदे, योगेश घावरे, सतीश शिंदे, अनुज पार्टे ही मुले सक्रीय कार्यरत असतात.