तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून पोलादपूर शहरामध्ये महायुतीचे उमेदवार खा.सुनील तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यामध्ये भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सुमारे 5 लाखांपेक्षा जास्त मते मिळवित महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा 80 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून विजय संपादन केल्याबद्दल महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून फटाक्यांची आतषबाजी आणि खालू ताशांच्या निनादात जल्लोष साजरा केला. यावेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ महायुतीच्यावतीने घोषणाबाजी सुरू होऊन विजयोत्सवाला सुरूवात झाली. यावेळी महामार्गापासून थेट बाजारपेठमार्गे वाजत गाजत फटाक्यांची अतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरसेवक विनायक दिक्षित, प्रसाद इंगवले, सनी विचारे, प्रसाद मोरे, नारायण साने, अनिल दळवी, सिध्देश कळंबे, भाजपचे प्रसन्ना पालांडे, महेश निकम, भाऊ सुर्वे, समाधान शेठ, मनसेचे दर्पण दरेकर, ओंकार मोहिरे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुश्ताक मुजावर यांच्यासह आदींसह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते या विजय मिरवणूकीत सहभागी झाले.
पोलादपूर तालुक्यातून खा.तटकरे यांना मताधिक्य देण्यात महायुतीचे कार्यकर्ते यशस्वी झाल्याचा दावा यावेळी भाजपचे स्थानिक नेते प्रसन्ना पालांडे यांनी केला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.