
खासदार धर्यशील पाटील यांचा भागवत धर्माच्या शिकवणीवर भर
पेण :
डोलवी, पेण येथे श्रीमद् भागवत सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात खासदार धर्यशील पाटील यांनी भागवत धर्मानुसार प्रत्येकाने आपली कर्मे करत राहावी, आणि ज्याला ज्या कार्याची आवड आहे, ते मनापासून करावे, असे मार्गदर्शन केले. डोलवी येथील सरपंच परशुराम म्हात्रे यांच्या निवासस्थानी हा सप्ताह पार पडला.
यावेळी खासदार धर्यशील पाटील यांचा सत्कार सरपंच परशुराम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व भारतीय राजमुद्रा देऊन करण्यात आला. यावेळी जेएसडब्ल्यू कंपनीचे उपाध्यक्ष राजेश रॉय, जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर, भाजपचे वैकुंठ पाटील, राजु पिचिका यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रवचनकार पुरुषोत्तम महाराज धाटावकर आणि शेकडो धार्मिक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एल. एस. जांभळे यांनी केले.