राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात 16 कोटी रुपये खर्चून जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले.
रविवार, 9 फेब्रुवारी, रोजी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला.खानाव,खरीवली,गोहे,गोरठण, होराळे,परखंदे,वावोशी आणि वडवळ या गावांमध्ये सदर योजनेमुळे सदर तलावांचे पुनर्जीवन होऊन गावांमध्ये पर्यावरण स्थळ विकसित होणार आहे त्यामुळे गावाच्या आणि तालुक्याच्या लौकिककात भर पडणार आहे.
यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.