रायगड जिल्ह्यातील मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगीत नृत्यच्या नावाखाली असलेले खालापूर तालुक्यातील कलोते गावाच्या हद्दीत असलेल्या स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्टा बारमध्ये ऑर्केस्ट्रा म्युझिकच्या नावाखाली अवैध डान्सबार सुरू असल्याचे आढळून आले आहे. या तीन डान्सबारवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करीत बत्तीस बारबालांसह चाळीस जणांवर खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाई झालेल्या पैकी बहुतांश बारबाला आणि इतरपैकी परप्रांतीय आहेत.
रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलिस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कलोते येथील स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्टा बारच्या नावाखाली सर्रास डान्सबार सुरु आहे. या बार मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गाण्यावर अश्लील नृत्य आणि जमिनीवर बसून बीभत्स नृत्य करतात आणि नृत्य करणाऱ्या बारबालांवर पैसे उडवतात,अशी माहिती रायगड पोलिस विभागाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सत्यता पडताळून पाहिली असता त्यामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले.
सदर माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देताच त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे 3 पोलीस अधिकारी व 22 पोलीस अंमलदार, 6 महीला अंमलदार तसेच बांगलादेशी पथकाकडील 1 पोलीस अधिकारी व 1 महीला पोलीस अंमलदार यांची 3 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
सदर पथकानी कलोते येथील स्वागत, पूनम आणि लोधिवली येथे ऑर्केस्टा बारमध्ये जावुन पाहणी केली असता या 3 बारमध्ये बारबाला मद्यप्राशन करत असलेल्या ग्राहकाबरोबर संगिताचे तालावर अश्लील हावभाव व बीभत्स नृत्य करताना आढळुन आले तसेच सदर बारमधील कर्मचारी व ग्राहक त्यांना अश्लील हावभाव व बीभत्स नृत्य करताना प्रोत्साहित करीत असताना दिसले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लोधीवली येथील हॉटेल समुद्रा या बारवर कारवाई करीत राहुल नरेश यादव सहित इतर बावीस जणांवर कारवाई केली असून यामध्ये आठ बारबाला यांचा समावेश आहे. तर कलोते येथील हॉटेल स्वागत बारमध्ये मिरा खातुन सुखचंद शंख व इतर 28 जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये बारा बारबाला यांचा समावेश आहे. तर त्यालाच लागून असलेल्या हॉटेल पुनम बार मध्ये तोश संजीवा मोगविरा व इतर 22 जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये देखील बारा बारबाला यांचा समावेश आहे.
तिन्ही बार कलम २६६,५४,३,२९६, (५) भारतीय न्याय संहिता कायदा मह कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ (१), डब्यु १३१ गह ११०,११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात गुन्हा रजि. नं.६२ /२०२५ कलम २९६,५४,३,२९६, (५) भारतीय न्याय संहिता कायदा मह कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३३ (१), डब्यु १३१ गह ११०,११२/११७ अन्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकसोमनाथ घार्गे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस निरीक्षक रूपेश नरे, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे (बांगलादेशी पथक), सहा.पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जोशी, पोलिस हवालदार यशवंत झेमसे, अमोल हंबीर,जितेंद्र चव्हाण,सचिन शेलार,रूपेश निगडे, विकास खैरनार,परेश म्हात्रे,सुदिप पहेलकर,अस्मिता म्हात्रे,रेखा म्हात्रे अभियंती मोकल, भाग्यश्री पाटील, अर्चना पाटील, झुलिता भोईर,रसिका सुतार,(बांगलादेशी पथक),पोलिस शिपाई तुशार कवळे, मोरेश्वर ओमले, लालासो वाघमोडे, ओंमकार सोंडकर, बाबासो पिंगळे, अक्षय जगताप, भरत तांदळे, ईश्वर लांबोटे, सागर थळे, यांनी केली आहे. ——- लेडीज ऑर्केस्ट्रा बार असून यामधील बहुतांश बारवर अनेकदा छापेमारी करून देखील बारमधील छमछम काही थांबताना दिसत नाही. —- काही बारमध्ये बारबाला नसतात पण स्टाफच्या नावावर सुंदर तरुणींची निवड करण्यात येते. मध्यरात्रीनंतर थेट त्या मुली देहव्यापारासाठी सज्ज असतात. —- अनेक बियरबारमध्ये बारबालांना अश्लील नृत्य करायला लावून बारमालक मालामाल होत आहेत. रात्रभर सुरू असलेल्या बारबालांवर आंबटशौकीनांना पैशाची उधळण करीत होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.